*सांगली आकाशवाणीतील व शास्त्रीय संगीत सतार वादनाच्या कलेच्या विश्वातील देव उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर यांच्या मुलाखतीतून प्रकट झालेली माहिती--*

0

 *सांगली आकाशवाणीतील व शास्त्रीय संगीत सतार वादनाच्या कलेच्या विश्वातील देव उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर यांच्या मुलाखतीतून प्रकट झालेली माहिती--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)*  सांगलीच्या आकाशवाणी केंद्रात सेवेत असलेले, शास्त्रीय संगीत कलेस आयुष्य समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणजेच *उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर* . उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर यांचा जन्म बेडकीहाळ या गावी कर्नाटक राज्यामध्ये सन 1963 साली झाला. त्यांना प्राचीन भारतीय संगीत कलेचा वारसा सुरुवातीपासूनच लाभलेला होता. त्यांचे वडील म्हणजे उस्ताद *हुसेन साहब नदाफ* जे शास्त्रीय संगीतातील क्लोरोनेट वादनास समर्पित केलेले आदरणीय व्यक्तिमत्व होय .त्यांचे वडील *उस्ताद हुसेन साहेब* यांनी धारवाड आकाशवाणी केंद्रात क्लरेनेट वादक म्हणून 1972 साली सेवेस प्रारंभ केला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय धारवाड येथे राहण्यास होते. उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर यांना बाल्यावस्थेपासून धारवाड मध्ये असल्यापासून, शास्त्रीय संगीताची आवड होती. शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार *पंडित मल्लिकार्जुन मन्सूर ,पंडित बसवराज राजगुरू ,विदुषी गंगुबाई हनगल, उस्ताद बालेखान, उस्ताद हमीद खान* यांचा शास्त्रीय संगीतातील प्रवासात, सहवास लाभला. गुरुवर्य प्रसिद्ध सतार वादक *उस्ताद बाले खान* यांचा वयाच्या *दहाव्या* वर्षापासून सहवास लाभून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ,सतार वादनाचा श्री गणेशा चालू केला .गुरुवर्य उस्ताद बाले खान यांनी उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर यांच्या घरी शास्त्रीय संगीतातील सतार वादनाचे धडे दिले. गुरुवर्य उस्ताद बाले खान यांच्या आशीर्वादाने रीतसर आकाशवाणी केंद्राची परीक्षा उत्तीर्ण होऊन, शास्त्रीय संगीतातील आकाशवाणी मान्यताप्राप्त *सतार वादक* म्हणून सुरुवात झाली. त्याचप्रमाणे त्यांना शास्त्रीय संगीतातील *आंतरराष्ट्रीय कलाकार सतारवादक उस्ताद शाहिद परवेज* यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला . *उस्ताद रफीक हुसेन नदाफ सर* यांनी सांगली आकाशवाणी केंद्रात सन 1995 साली शास्त्रीय संगीतातील सतार वादक म्हणून सेवेस प्रारंभ केला. केंद्र शासनाच्या सांगली आकाशवाणी केंद्रात सतार वादनातील" *ए" क्लासच्या श्रेणीत* ते गेली वीस वर्षे सेवा करत आहेत .केंद्र शासनाच्या आकाशवाणी केंद्रातर्फे *कर्नाटक, गोवा ,महाराष्ट्र ,उत्तर प्रदेश ,केरळ, मध्य प्रदेश ,तामिळनाडू* आणि इतर राज्यांमध्ये होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या सभेमध्ये *सतार वादनाचे* भरपूर कार्यक्रम त्यांचे झाले आहेत .त्यांचा शिष्य परिवार हा मोठा असून, त्यातील काही नावाजलेले शिष्य विविध ठिकाणी आकाशवाणी केंद्राच्या सेवेत आहेत. त्यांच्या शिष्य परिवारांमध्ये नावाजलेल्या संतूर वादक सौ .वरदा खाडिलकर, मिरज येथील सतार वादक विनायक गोखले, बेंगलोर येथील विजय गोनहल, सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील श्रीराम पोतदार, सोलापूर येथील सुंदरी वादक अमोल जाधव यांचा आदराने उल्लेख करावासा वाटतो. सध्या रफिक हुसेन नदाफ सर यांचा मुलगा शफात हा *आंतरराष्ट्रीय* ख्यातीचे सतार वादक *उस्ताद शहीद परवेज* यांच्याकडे गेली पाच वर्षापासून शास्त्रीय सतार वादनाचे धडे गिरवत आहे. त्यांच्या कौटुंबिक परिवारांमध्ये मुलगा शफात  हुसेन व सज्जाद हुसेन याना सतार वादनाचा घराण्यातून आलेला वारसा लाभलेला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top