सांगली- भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या आत्मचरित्रातून प्रकट झालेले, माणुसकीचे दर्शन----*

0

 *सांगली- भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या आत्मचरित्रातून प्रकट झालेले, माणुसकीचे दर्शन----* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *( अनिल जोशी)* 


श्री टी.एन. शेषन जेव्हा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त असताना कुटुंबासोबत सुट्टी घालविण्यासाठी मसुरीला जात होते. आपल्या कुटुंंबासह उत्तर प्रदेशातून बाहेर पडताना ,त्यांना चिमण्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी बांधलेली अनेक सुंदर घरटी झाडांवर बांधलेली त्यांना दिसली परंतू

चिमण्यांची घरटी पाहून त्यांच्या पत्नीने , त्यांच्या घराच्या भिंती सजवण्यासाठी दोन चिमण्यांची घरटी असावी अशी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यास कळली, त्यानुसार त्या पोलीस अधिकाऱ्याने तेथे गुरे चारत असलेल्या एका लहान मुलाला बोलावून, त्याला दोन चिमण्यांची घरटी झाडांवरून तोडून आणण्यास सांगितले. तेव्हा त्या मुलाने नकारार्थी मान हलवली.

श्री शेषन यांनी त्यासाठी मुलाला 10 रुपये देऊ केले. तरीही, मुलाने नकार दिल्यावर, श्री शेषन यांनी ती रक्कम वाढवून ₹ ५०/- करण्याची ऑफर दिली. तरीही मुलगा राजी झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी मुलाला धमकावले आणि सांगितले की साहेब न्यायाधीश आहेत आणि तुला तुरुंगातही टाकू शकतात. त्यानंतर तो मुलगा श्रीमती आणि श्री शेषन यांच्या गाडीजवळ जाऊन त्यांना म्हणाला, "साहेब, मी तसे करू शकत नाही. त्या घरट्यांमध्ये चिमण्यांची लहान पिल्ले आहेत. त्या पिल्लांची आई अन्नाच्या शोधात बाहेर पडल्या आहेत. त्या जेव्हा परत येतील आणि त्यांना त्यांची मुल दिसणार नाही, तेव्हा त्या चिमण्या खूप दुःखी होतील ज्याचे पाप मी घेऊ शकत नाही."

हे ऐकून श्री टी.एन. शेषन थक्क झाले. श्री शेषन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात  लिहिले आहे की, – “त्या लहान, अशिक्षित, गुरेढोरे पाळणार्‍या मुलाने उच्चारलेल्या शब्दांपुढे माझे पद, सत्ता आणि आयएएस पदवी क्षणात विरघळली.” पत्नीने घरट्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आणि घरी परतल्यानंतर माझ्या मनात त्या घटनेने अपराधीपणाच्या खोल भावनेने घर केले. 

खरे तर उच्च शिक्षण आणि महागडे ब्रँडेड कपडे घातले म्हणजे माणुसकीचे दर्शन होते असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा व खोटा आहे. *माणुसकीचे दर्शन हे आंतरिक संस्कारातून जन्माला येते.* ममता, इतरांप्रती चांगुलपणाची भावना, फसवणूक न करण्याची भावना, तसेच त्या माणसाला कुटुंबातील थोरामोठ्यांनी दिलेल्या संस्कारातून आणि चांगल्या संगतीतून येते, संगत वाईट असेल तर चांगले गुण येण्याचा प्रश्नच येत नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top