सांगली भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव पृथ्वीराज भैय्या पवार व युवा नेते गौतम पवार यांच्या विशेष प्रयत्नातून, सांगली, मिरज ,कुपवाड शहर महापालिकेस दोन इ घंटागाडी प्रदान सोहळा संपन्न---*

0

 *सांगली भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव पृथ्वीराज भैय्या पवार व युवा नेते गौतम पवार यांच्या विशेष प्रयत्नातून, सांगली, मिरज ,कुपवाड शहर महापालिकेस दोन इ घंटागाडी प्रदान सोहळा संपन्न---*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 सांगलीत ," *राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा"* पंधरवडा निमित्य, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज भैय्या पवार व युवा नेते पै. गौतम भैया पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली, मिरज ,कुपवाड शहर महापालिकेस, रुपये ७ लाख किमतीच्या दोन इ घंटागाड्या प्रदान करण्यात आल्या. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेस, दोन इ घंटागाडी प्रदान सोहळा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सांगली शहरातील मारुती चौकात ,भव्य स्टेज उभारून शानदार इ घंटागाडी प्रदान सोहळा संपन्न झाला. यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार व युवा नेते गौतम पवार यांनी  सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेस, सात लाख रुपये किंमतीच्या दोन इ  घंटागाड्या प्रदान करण्याचा संकल्प केला होता. या घंटागाडी प्रदान करण्याच्या सोहळ्याच्या वेळी ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, शहराध्यक्ष दीपक बाबा शिंदे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top