*पंढरपूर येथे एकादशीनिमित्त पालकमंत्री डॉ.सुरेश(भाऊ)खाडे यांनी निर्धार फौंडेशनचा केला सन्मान--*

0

 *पंढरपूर येथे एकादशीनिमित्त पालकमंत्री डॉ.सुरेश(भाऊ)खाडे यांनी निर्धार फौंडेशनचा केला सन्मान--* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


निर्धार फाउंडेशनच्या स्वच्छता वारीचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री यांनी दखल घेऊन निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दत्तनगर यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. कार्तिकी वारी निमित्त निर्धार फौंडेशनच्या माध्यमातून "सांगलीची स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी" ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती.या अभियानाची दखल घेत पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी एकादशी निमित्त पंढरपूर येथे बोलावून घेत निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमचे कौतुक करीत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले की, महाराष्ट्राला हजारो वर्षांचा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे,वर्षानुवर्ष महाराष्ट्र व इतर राज्यातून वारीच्या माध्यमातून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे दाखल होत असतात.भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाला कंबर असावी लागत असते.अशातच पहिल्यांदा निस्वार्थपणे सेवेच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातून निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व टीमने एक आगळीवेगळा उपक्रम घेऊन १०० हुन अधिक स्वच्छतादूतांच्या माध्यमातून चंद्रभागाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन करून स्वच्छतेचा संदेश कृतीतून देण्याचा प्रयत्न केला ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.सदर मोहीम महाराष्ट्राला आदर्शवत ठरणारी अशी आहे.यापुढील काळात देखील अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या जाव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

राकेश दड्डणावर म्हणाले की,स्वच्छतेचा निर्धार करून आम्ही युवक गेली १६०० दिवस झाले सांगली शहरातील विविध भागात स्वच्छता  मोहीम राबवित आहोत,ही मोहीम कोणत्याही शासकीय अनुदानशिवाय असून लोकसहभागातून चालू आहे.पंढरपूरच्या अभियानाची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी जो सन्मान केला त्यामुळे मन भारावून गेलं... हा सन्मान मी माझ्या १०० स्वच्छतादूतांना व दानशूर व्यक्ती यांच्यामुळे यशस्वी झाली त्यांना समर्पित करतो.या सन्मानाने काम करण्यासाठी एक ऊर्जा मिळाली असून आणखी जोमाने काम करत राहू.

     यावेळी कृष्णा मडीवाळ,अनिल अंकलखोपे,वसंत भोसले,अनिरुद्ध कुंभार,मनोज नाटेकर, रोहीत कोळी आदि निर्धार फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top