*सांगलीत पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस या रोगाच्या पहिल्या रुग्णावर सांगली सिव्हिल मध्ये यशस्वी उपचार ---*

0

 *सांगलीत पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस या रोगाच्या पहिल्या रुग्णावर सांगली सिव्हिल मध्ये यशस्वी उपचार ---* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


सांगलीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या पुढाकाराने *पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस* रोगाच्या रुग्णाला यशस्वी उपचार होऊन,  त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला.

राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील साहेब , राष्ट्रवादी सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  व असीभाई बावा यांच्या सहकार्याने आणि समीर कुपवाडे यांच्या मदतीने राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वर्षभर अनेक गरजू व गरीब रुग्णांची  विविध शस्त्रक्रिया मोफत करण्याचे काम सुरू असते . 

त्याच माध्यमातून आज सांगली मध्ये सिव्हिल रुगणालायत पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस हा रोग झालेल्या पेशंटचे यशस्वी उपचार राष्ट्रवादी च्या पुढाकाराने करण्यात आले .

  यावेळी राष्ट्रवादी चे आरोग्य विभागाचे काम पाहणारे उमर गवंडी म्हणाले की 

     " काही दिवसांपूर्वी सांगली मधील एका तरुणी ला तीव्र *पस्ट्युलर एक्सेंथेमॅटोसिस* या त्वचारोगाचे निदान झाले होते. हा रोग २ करोड लोकांमध्ये १ व्यक्तीला होत असतो. रुग्णांच्या कुटूंबियांना, खासगी रुग्णालयात सदर  रोगाच्या उपचारासाठी ५ ते ६ लाख इतका येणार असल्याचे सांगितले होते. कुटूंबियाची परिस्थिती अत्यंत अतिशय बिकट असल्याने येणारा खर्च ५ ते ६ लाख हा खर्च करणे शक्य नव्हते .

      सदर कुटूंबानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज यांची भेट घेऊन सगळी माहिती दिल्यानंतर , राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांनी व राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज  यांनी मला सूचना दिल्या ,  व मी तात्काळ पेशंट ला सांगली सिव्हिल येथे दाखल केले व सांगली सिव्हिल चे डॉ डॉ संतोष माळी सर , डॉ शुभम पाटील , डॉ गणेश सावळगे , डॉक्टर शुभाशिष ,डॉ शुभम गुजराथी , डॉ मयुरेश दीक्षित यांनी  यशस्वी  उपचार केले, तसेच या रुग्णासाठी खास करून स्किनचे तज्ञ डॉक्टर ,मानसोपचारचे  तज्ञ डॉक्टर,डोळ्यांचे तज्ञ डॉक्टरया सर्व डॉक्टरांची टीम या रुग्णासाठी प्रयत्न करत होती .

         तसेच  आज त्या पेशंटला डिस्चार्ज दिला, यावेळी  रुग्णांचे नातेवाईक यांनी राष्ट्रवादी चे व सांगली सिव्हिल चे आभार मानत, सांगली सिव्हिल ला वाफे चे मशीन भेट म्हणून दिले आहे .

    यावेळी  आरोग्यदूत , उमर गवंडी , प्रमुख सचिव शुभम जाधव , मुन्नाभाई शेख , शहानवाज फकीर , सलमान बाबा,  शुभम ठोंबरे, नदीम मगदूम , रफिक बाबा, इम्तियाज शेख आदी पदाधिकारी व नातेवाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top