*सांगली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाजातील घटकांनी घ्यावा--- समाजरत्न नितीन भाऊ बडेकर.*

0

 *सांगली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील थेट कर्ज योजनेचा लाभ मातंग समाजातील घटकांनी घ्यावा--- समाजरत्न नितीन भाऊ बडेकर.*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* ) 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील थेट कर्ज योजनेचा लाभ, राज्यातील मातंग समाजातील घटकांनी घ्यावा असे आवाहन डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडन्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष समाज रत्न नितीन भाऊ बडेकर यांनी केले आहे. सदरहू थेट कर्ज योजनेअंतर्गत, कोणत्याही बँकेकडून अडवणूक होणार नसून, समाज बांधवांनी याचा लाभ घेण्यासाठी, कोणतीही भीती न बाळगता आपले प्रस्ताव, संबंधित जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळच्या कार्यालयात, कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन समाज रत्न नितीन भाऊ बडेकर यांनी केले आहे. राज्यातील मातंग समाजातील व्यक्तीला काही अडचण आल्यास 95 522 33 248 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडन्ट असोसिएशन हि संस्था, शासनाच्या विविध योजना समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत असून, या योजनेचा लाभ समाजातील घटकांनी घ्यावा असे आवाहन समाज रत्न नितीन भाऊ बडेकर संस्थापक अध्यक्ष डिप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशन यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top