सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीस शासनाने त्वरित मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा-- सांगली कृषी* *उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत .*

0

 *सांगली जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीस शासनाने त्वरित मदत करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा--  सांगली कृषी* *उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत .* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *( अनिल जोशी)*  सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जिरायत शेती अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेली आहे .त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे. शेतीमधील तन काढायचं सुद्धा अजून घात आलेली नाही. त्यामुळे शाळू ,हरभरा यांचे पेरण्या सुद्धा अजून झालेले नाहीत .आता पेरल्यानंतर हंगाम नसल्याने जिरायत शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे .जिरायत शेतामध्ये काहीही येणार नाही. त्यामुळे जनावरांना चारा सुद्धा मिळणार नाही .शेतकऱ्यांना धान्य सुद्धा मिळणार नाही म्हणून शासनाने जनावरासाठी चारा व शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी ताबडतोब पंचनामा करून, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे .तीन महिने झाले शासन अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोचलेले नाही, म्हणून शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून ताबडतोब मदतीचा हात द्यावा .शासन कुठल्याही पक्षाचा असो. शेतकरी देशाचा राजा आहे. जर शेतकऱ्यांना मदत होणार नसेल राजकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून, शेतकऱ्याला मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. असे न झाल्यास या जिल्ह्यातला जिरायत शेतकरी उध्वस्त होणार आहे. कडधान्य असो, ज्वारी असो ही पिके पुढील काळात येणार नाहीत म्हणून या शेतकऱ्यांना मदत न झाल्यास ,सर्व पक्ष विसरून शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे ही राज्यकर्त्याची व शासनाची जबाबदारी आहे. आपण दुर्लक्ष केल्यास आम्हाला शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुभाष खोत यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्ग अवकाळी पावसामुळे पूर्णतः उध्वस्त झाला असून याची कोणत्याही पक्षाला, राज्यकर्त्याला खंत दिसत नसल्याचे जाणवते. महाराष्ट्र शासनाने या गोष्टीवर लक्ष घालून ,सत्वर शेतकरी वर्गाला दिलासादायक निर्णय घेऊन मदत करण्याची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top