सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली तर्फे पी.एन.जी. महाकरंडक अांतर महाविद्यालयीन भव्य एकांकिका स्पर्धा आयोजित---*

0

 *सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली तर्फे पी.एन.जी. महाकरंडक अांतर महाविद्यालयीन भव्य एकांकिका स्पर्धा आयोजित---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 



 सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली तर्फे पी.एन.जी.अांतर महाविद्यालयीन " *एकांकिका स्पर्धा* " आयोजित करण्यात आल्या आहेत.

१) सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर२०२२ पासून सकाळी ११:३० वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होत असून, बरोबर सकाळी १०:०० वाजता रा.शी. गोसावी कलानिकेतन कला महाविद्यालय कोल्हापूर या संस्थेकडून " *आर्टिफिशियल इंटेलिजन्स"* एकांकिका सादर होत आहे. विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर या संस्थेकडून दुपारी १२:३० वाजता " *भगदाड"* ही एकांकिका सादर होत आहे तसेच कमिंस अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या संस्थेमार्फत" *चाराणे* "ही एकांकिका दुपारी ०१:३० वाजता सादर होत आहे.

२)मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एकांकिका- महावीर विद्यालय कोल्हापूर या संस्थे ची सकाळी ९:३० वाजता " *स्मारकाची गजाल"* ही एकांकिका सादर होत आहे .सकाळी १०:३९ वाजता, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी या संस्थेमार्फत " *गांधी ते गोध्रा* " ही एकांकिका सादर होत आहे. सकाळी ११:३० वाजता, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या संस्थेमार्फत " *लॉटरी"* ही एकांकिका सादर होत आहे. दुपारी १२:३० वाजता ,सौ मंगलाताई जगताप महिला महाविद्यालय उंब्रज या संस्थेमार्फत *"हिरवी* " ही एकांकिका सादर होत आहे. दुपारी २:१५ मिनिटांनी डी.पी .भोसले महाविद्यालय कोरेगाव या संस्थेमार्फत " *चालू द्या तुमचं* "ही एकांकिका सादर होत आहे .दुपारी ३:१५ वाजता डी .वाय .पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर " *होत असं कधी कधी"* ही एकांकिका सादर होत असून दुपारी ४:१५ वाजता आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे या संस्थेमार्फत " *फराळ* " ही एकांकिका सादर होत आहे .

३)बुधवारी दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एकांकिका- देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर या संस्थेमार्फत सकाळी ९:३० वाजता " *जन्नत उल फिरदोस"* ही एकांकिका सादर होत आहे .दुपारी १०:३० वाजता मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालय कडेगाव या संस्थेमार्फत " *अबूटभर* " ही एकांकिका सादर होत आहे. दुपारी १२:३० वाजता श्री स.ह. केळकर कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवगड या संस्थेमार्फत *"डू ऑर ड्राय* " ही एकांकिका सादर होत आहे. दुपारी २:१५ वाजता डी. बी .जे .महाविद्यालय चिपळूण या संस्थेमार्फत" *बिराड* " ही एकांकिका सादर होत आहे .दुपारी ३:१५  वाजता राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय इस्लामपूर या संस्थेमार्फत " *तुम्ही और नॉट टू मी"* ही एकांकिका सादर होत असून दुपारी ४:१५ वाजता दत्ताजीराव कदम आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय इचलकरंजी या संस्थेमार्फत शेवटी " *म्हातारा पाऊस* " ही एकांकिका सादर होत आहे .या *पी.एन.जी. महा करंडक अांतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ६:०० वाजता होईल. या* सर्व होणाऱ्या स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ याचे स्थळ- *विष्णुदास भावे नाट्य मंदिर,* हरभट रोड असून एकांकिका बघण्यासाठी *प्रवेश विनामूल्य* ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top