सांगली- वैज्ञानिक संशोधनासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या संस्थेकडून सोडण्यात आलेले, दहा बलून( फुगे) आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी डॉ. राजा* *दयानिधी*

0

 *सांगली- वैज्ञानिक संशोधनासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या संस्थेकडून सोडण्यात आलेले, दहा बलून( फुगे) आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी डॉ. राजा* *दयानिधी*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दया निधी यांनी आव्हान केले आहे की - *टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद* या संस्थेने, आपल्या वैज्ञानिक संशोधनासाठी उपकरणासह सोडलेले *10 बलून* (फुगे )सांगली जिल्ह्यात कोठेही आढळल्यास पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, प्रशासनाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात अशा कोणत्याही ठिकाणी दृष्टीस झालेल्या बलून सदृश्य वस्तूला, कोणताही स्पर्श करू नये तसेच त्यातील असलेल्या उपकरणास कोणतीही छेडछाड, हानी पोहोचू नये असे आवाहन डॉ. राजा दयानिधी यांनी केली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या संस्थेकडून अवकाशात सोडण्यात आलेले बलून, सुमारे 30 ते 50 किलोमीटर उंचीवर जाऊन, ठराविक कालावधीनंतर, हैदराबाद पासून सुमारे 200 ते 400 किलोमीटर अंतरावर कोठेही उतरू शकतात. हे बलून 50 मीटर ते 85 मीटर व्यासाचे असून ,वैज्ञानिक उपकरणासह अवकाशात सोडले असून ते हायड्रोजन वायू ने पूर्णपणे भरलेले आहेत .टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैदराबाद या संस्थेकडून सोडण्यात आलेले बलून, हे काही पूर्व निर्धारित केलेल्या कालावधीच्या वेळेनंतर, जमिनीवर उतरावयास सुरुवात होते .संबंधित वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेले बलून हे हैदराबादच्या आसपास म्हणजे विशाखापट्टण ,सोलापूर, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांमध्ये उतरण्याची दिशा संभवत आहे .या वैज्ञानिक संशोधनासाठी सोडलेल्या बलून मध्ये वैज्ञानिक संशोधनासाठी असलेली उपकरणे हीअत्यंत मौल्यवान किंमतीची असून ,त्यातील माहितीही वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. संबंधित वैज्ञानिक संशोधनासाठी सोडण्यात आलेले बलून ज्या ठिकाणी उतरतील, त्या ठिकाणच्या *संबंधित बलून संबंधी माहिती देणाऱ्या व्यक्तीस, योग्य त्या बक्षीसासह प्रवास खर्च व इतर समाविष्ट असलेले खर्च* देण्यात येतील. संपूर्ण सांगली जिल्ह्यात असे कोणतेही बलून उपकरणासहित आढळून आल्यास, प्रशासनाशी तातडीने संपर्क करावा असे आव्हान डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top