सांगलीत " भारत जोडो" यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष श्रीमती शैलाजाभाभी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न--*

0

 *सांगलीत " भारत जोडो" यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष श्रीमती शैलाजाभाभी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 



अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या " *भारत जोडो"* यात्रेत सहभागी होण्यासाठी, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा मा. श्रीमती शैलजाभाभी पाटील यांच्या अध्‍यक्षतेखाली प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शैलजा पाटील म्हणाल्या “देशाच्या लोकशाही मूल्यावर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी द्वेष, भयंकर विघटन आणि भेदभावावर आधारित राजकारण थांबवण्यासाठी, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, दलित, आदिवासी,महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी तसेच वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरोधासाठी, सन्माननीय राहुलजी गांधी यांनी " *भारत जोडो* " अभियानाची सुरुवात केली आहे. तरी सांगली जिल्‍ह्यातील जास्तीत जास्त महिलावर्ग यांनी भारत जोडो यात्रेत एकत्रित येऊन हुकुमशाहीला हद्दपार करुया आणि यात्रा मोठ्या उत्‍साहात पार पाडूया” असे आवाहन केले.

यावेळी सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा करूणा सॅमसन, मिरज तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अंजू तोरो, उपाध्यक्षा निर्मला बस्तवडे, माजी समाज कल्याण सभापती नंदाताई कोलप, माजी जिल्हा परिषद सदस्या सुचेता कांबळे, नगरसेविका मदिना बारुदवाले,पद्माळेच्या माजी सरपंच शैलजा पाटील, माधवनगरच्या माजी सरपंच शोभा चव्हाण, माजी नगरसेविका सुवर्णा पाटील, आरती गुरव, अर्चना कबाडे, शोभाताई कोल्हे, मायाताई आरगे, शमशाद नायकवडी, जन्‍नत नायकवडी इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top