*सांगलीच्या निर्धार फाउंडेशन च्या वतीने, "स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी" या उपक्रमांतर्गत स्वच्छता सेवा ---*

0

 *सांगलीच्या निर्धार फाउंडेशन च्या वतीने, "स्वच्छतावारी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दारी" या उपक्रमांतर्गत स्वच्छता सेवा ---* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी)* 


सांगलीच्या निर्धार फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत १०० स्वच्छतादूतांचा सहभागाने, दिवसभरात सुमारे 3 टन कचरा संकलन करून आज कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या दारी आपली सेवा रुजू केली.



कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर  येथे चंद्रभागा तीरावर निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर व १०० स्वच्छतादूतांची स्वच्छतावारी.दिवसभरात ३ टन कचरा संकलन करून घाट परिसर स्वच्छ केला.पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या कडून प्रशासनाला मदतीसाठी आदेश दिला होता.कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पार पडत असलेल्या वारीला महाराष्ट्र व इतर राज्यातून लाखो वारकरी बांधव सहभागी होत असतात .यावेळी अस्वच्छतेचा मोठा  प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच पांडुरंगाचे चरणी एक वेगळ्या पद्धतीने भक्ती अर्पण करावी व प्रशासनाला सहकार्य या दोन्हीच्या हेतूने निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांनी "सांगलीची स्वच्छता वारी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारी" ही अनोखी मोहीम हाती घेतली.या मोहीमेत तब्बल शंभरहून अधिक स्वच्छता दूत सहभागी झाले होते.



      राकेश दड्डणावर म्हणाले की,रविवारी भल्या पहाटे दोन बसेस ने आम्ही सर्व स्वच्छतादूत सांगलीहून पंढरपूर जाऊन सकाळी 11:00 ते सायं 4 :00 असे 4-50 तास विठ्ठल मंदिराच्या परिसरातील चंद्रभागा नदी काठावरील निर्माल्य अन्य कचरा संकलन करून घाटांची स्वच्छता केली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी भक्ती व्हावे व सेवाभावी वृत्तीने मंत्रमुग्ध होऊन स्वच्छता केली.स्थानिक प्रशासनाकडून एक जेसीबी व मोठा कंटेनर कचरा उठाव साठी मिळाला होता.रात्री उशीरा सांगलीत ही वारी पोहचली.सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा अनुभव व आनंद होता‌.

     मनोहर सारडा म्हणाले की,सांगली हून पंढरपूरला स्वच्छतेसाठी 100 जण खरच कौतुकास्पद आहे.राकेश व टीमचे काम उल्लेखनीय असून आम्ही यापुढे त्यांना सढळ हाताने मदत करत राहू.



     स्वच्छता वारीसाठी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील व आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले यांनी प्रत्येकी एक-एक बसची सोय करून दिली होती.लक्ष्मण नवलाई,भारत जाधव,योगेश कापसे यांनी नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली.

      या अभियानात भारत जाधव,अपर्णा कोळी,भारत पाटील,मेघा मडीवाळ,वर्षा जाधव,निलेश लोकरे,अनिल अंकलखोपे,वसंत भोसले,अनिरुद्ध कुंभार,सचिन ठाणेकर,रोहीत कोळी,सविता शेगुणशी,मनोज नाटेकर,प्रथमेश खिलारे,मानतेश कांबळे आदिंसह असंख्य सहकार्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top