सांगलीत जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन--*

0

 *सांगलीत जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 



 राष्ट्रवादी महिला काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात *"गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी "* अश्या घोषणा देत निषेध आंदोलन सांगलीमध्ये महात्मा गांधी स्मारक , स्टेशन रोड सांगली येथे करण्यात आले.यावेळी महिला  राष्ट्रवादीच्या वतीने शिंदे-  फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


  यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव , सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम , मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे , अनिता पाटील, मेघा पाटील, छाया जाधव, अनिता कदम, वंदना चंदनशिवे, अलका माने,वैशाली कळके ,  गीतांजली इरकर, उज्वला पाटील , उषा गायकवाड , वैशाली पाटील ,छाया पांढरे , चंपाताई जाधव , सुजाता हेगडे आदी महिला  पदाधिकारी उपस्थित होत्या

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top