*सांगली नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड चे चेअरमन अण्णासाहेब कल्लाप्पा उपाध्ये यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध रचनात्मक सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम संपन्न--*

0

 *सांगली नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड चे चेअरमन अण्णासाहेब कल्लाप्पा उपाध्ये यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध रचनात्मक सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम संपन्न--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )

.

सांगलीत आज नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड संस्थेचे चेअरमन *अण्णासाहेब कल्लाप्पा उपाध्ये* यांचे सन 2022 -23 हे *अमृत महोत्सवी वर्ष* म्हणून साजरे करण्यात आले आहे व त्या अमृत महोत्सवानिमित्त विविध रचनात्मक सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरहू अमृत महोत्सव विविध रचनात्मक साजरे करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.  या समितीचे अध्यक्ष आमदार मोहन शेठ कदम ,उपाध्यक्ष राजू पवार, प्राध्यापक बापू जाधव, सनी धोत्रे ,समीर मुजावर आणि संस्थेचे अनेक निवृत्त शिक्षकांनी सहभाग घेतला होता. तसेच या सर्वउपक्रमात प्रामुख्याने नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन सहभाग घेतला होता .अमृत महोत्सवी वर्षात एकूण बारा उपक्रम घेण्याचा संकल्प समितीने केला होता. त्याप्रमाणे 15 नोव्हेंबर 2022 रोजी आकुज ड्रीमलॅंडच्या विस्तीर्ण परिसरात ,सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन, उद्घाटनासाठी डॉ. विशिदा कुलकर्णी मिरज यांना अमृत महोत्सवी संस्थेने निमंत्रित केले होते. संस्थेचे पर्यवेक्षक अनिल चौगुले यांनी अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रमा संबंधी व संस्थेच्या कामासंबंधी माहिती दिली. अण्णासाहेब उपाध्ये हे एक शिक्षण तज्ञ असून व उद्योजक म्हणून अखंड सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मितभाषी, संयमी, निर्व्यसनी आणि निष्कलंक चारित्र्याचा असून शैक्षणिक कार्यात उभे केलेले काम अत्यंत मौलिक आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर भावगीते व भक्ती गीतांच्या स्पर्धा पण संपन्न झाल्या. राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणारा हा उपक्रम होता. राष्ट्रसंत तरुण सागर महाराजांच्या 55 व्या जयंतीचे औचित्य साधून धन्यकुमार शेट्टी व गुरुदेव भक्त परिवारातर्फे अकूज ड्रीमलॅंडच्या परिसरात 55 वृक्षांचे रोपण झाले तसेच या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणच्या वंचित असणाऱ्या गरीब लोकांना साड्या, चटई, मच्छरदाणी आधी साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 वृद्ध जोडप्यांचा सत्कारही करण्यात आला. अण्णासाहेब उपाध्ये यांच्या कर्तबगार कन्या डॉ. पूनम उपाध्ये यांच्या नेतृत्वाखाली अमृत व महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी ,नेत्रदान तपासणी शिबिर संपन्न झाले .याशिवाय नेमबाजी, संगीत शिक्षण, इंग्लिश स्पीकिंग कोर्स यांचे शिबिर राबवण्यात आली पोलीस व अग्नीवीर यांना प्रशिक्षण देण्यात, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मौलिक सहकार्य करण्यात, नवमहाराष्ट्र संस्थेचा मौलिक वाटा आहे .न्यू प्रायमरी स्कूल, अकुज प्रायमरी स्कूल, लालबहादूर शास्त्री बालवाडी, अकुज इंग्लिश मीडियम स्कूल, आशालता उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ,कॉलेज ऑफ आयटी, स्वच्छंद संगीत विद्यालय, अकुज स्पोर्ट्स आदी संस्थानच्या शाखा त्यांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. अण्णासाहेब उपाध्ये संस्थेचे अध्यक्ष असून त्यांचे चिरंजीव सुरज बादल उपाध्यक्ष आहेत. पुत्र बादल, पत्नी आशालता, स्नुषा सौ कांचन व कोमल राहुल पाटील, बाळासाहेब कोथळे हे संचालक आहेत व रितेश शेठ हे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. शेवटी कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांनी अण्णासाहेब उपाध्ये यांना, अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन दीर्घायुग्य लाभो अशी प्रार्थना केली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top