सांगली यंदाच्या वर्षीचा विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार, पुरस्कार मानकरी सतीश आळेकर यांना प्रदान करून संपन्न --*

0

 *सांगली यंदाच्या वर्षीचा विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार, पुरस्कार मानकरी सतीश आळेकर यांना प्रदान करून संपन्न --* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )  सांगलीमध्ये यंदाच्या वर्षीचा विष्णुदास भावे सुवर्णपदक पुरस्कार पुरस्काराचे *मानकरी सतीश आळेकर यांना* देऊन गौरवण्यात आला .दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार शनिवार दिनांक ०५/११/२०२२  रोजी पुरस्कार सोहळा संपन्न झाला .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल हे होते. सकाळच्या वेळी  झालेल्या कार्यक्रमांमध्ये सुरुवातीस नटराज पूजन व नांदिने सुरुवात झाली व जयश्री खाडिलकर ,शैलजा देशपांडे, श्रेयस कुलकर्णी, श्रीपाद सोहनी, धनश्री गाडगीळ, चंद्रकांत जाधव यांनी बहारदार नाट्यपदे सादर करून, उपस्थित रसिकांची मनी जिंकली. त्याचबरोबर आदिती कुलकर्णी यांनी संगीत स्वयंवर मधील , जान्हवी तानवडे यांनी सुवर्ण तुला मधील, चिन्मय गोखले यांनी कानोपात्रा मधील, ऋतुजा पटवर्धन यांनी संशयकल्लोळ मधील, कोमल पुरोहित यांनी संगीत वाहिनी मधील तसेच जान्हवी वाकणकर यांनी संगीत स्वयंवर मधील, नाट्यपदे सादर करून संगीत कलारसिकांची मनी जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीची जी नांदी गायली गेली त्यामध्ये जान्हवी वाकणकर ,केतकी परांजपे, आदिती कुलकर्णी , जान्हवी तानवडे, कोमल कुलकर्णी, ऋतुजा पटवर्धन या सर्व कलाकारांचा समावेश होता. वरील कार्यक्रमास संगीत साथ राजेंद्र कानिटकर, मुकुंद कागलकर ,श्रेय कुलकर्णी, श्रीपाद सोहनी यांनी केली. या संपूर्ण कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ.शरद कराळे ,उपाध्यक्ष विनायक केळकर विलास गुप्ते ,सौ .मेधा कुलकर्णी ,प्राचार्य भास्कर ताम्हणकर, विवेक देशपांडे ,बिना साखरपे ,आनंदराव पाटील व जगदीश कराळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top