सांगलीत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या," राज्य नाट्य स्पर्धेच्या" सांगली केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटनसमारंभ संपन्न --*

0

 *सांगलीत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या," राज्य नाट्य स्पर्धेच्या" सांगली केंद्रावरील प्राथमिक फेरीचा उद्घाटनसमारंभ संपन्न --* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित 61 व्या राज्य मराठी नाट्य स्पर्धे अंतर्गत, सांगली केंद्रावर होत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी विजय कडणे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होत असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेमुळे, कलाकारांना एक मोठे व्यासपीठ निर्माण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विजयदादा कडणे यांनी व्यक्त केले. गेली अनेक वर्षे मराठी रंगभूमीचा साक्षीदार म्हणून या नात्याने ,मी स्वतः अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे राज्य नाट्य स्पर्धा ही एक कलाकारांसाठी यशाची पहिली पायरी ठरत आहे. महाराष्ट्र शासनातच्या संस्कृती कार्य संचालनालयातर्फे गेली 61 वर्ष राज्य नाट्य स्पर्धा भरवण्याची परंपरा चालू असून, हे चित्र अखंड अव्याहतपणे चालू राहील असा आशावाद रंगकर्मी विजयदादा कडणे यानी व्यक्त केला. पहिल्या दिवशी अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीचे अजित दळवी लिखित, डॉक्टर दयानंद नाईक दिग्दर्शित, " *डॉक्टर तुम्ही सुद्धा* " हे नाटक सादर झाले .राज्य नाट्य स्पर्धाचे आयोजन हे *विष्णुदास भावे नाट्य मंदिरात* केले असून, आज पासून 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत  जवळपास 12 नाट्य संस्थांची नाटके सादर होणार आहेत. सांगलीतील नाट्यप्रेमी नाट्य रसिकांनी, हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, आवर्जून नाट्यप्रयोगांना उपस्थिती लावावी असे आवाहन समन्वयक मुकुंद पटवर्धन यांनी केली. स्पर्धेसाठी तिकिटाचा दर 10 व 15 रुपये आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, डॉ. शरद कराळे, डॉ. दिलीप पटवर्धन, राजेंद्र पोळ, अंजली भिडे, विशाल कुलकर्णी, कल्याणी पटवर्धन, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, अशोक रेडेकर, परीक्षक सुहास वाळुंजकर ,शेखर भागवत व विश्वास देशपांडे आदी सन्माननीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top