*कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे, परमगुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक 18/ 12/ 2022 रविवार पासून ते दिनांक 24/ 12/ 2022 शनिवार पर्यंत साजरा होणार --*

0

 *कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे, परमगुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक 18/ 12/ 2022 रविवार पासून ते दिनांक 24/ 12/ 2022  शनिवार पर्यंत साजरा होणार --* 

 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. क्षेत्र नृसिंहवाडी येथे, पूज्य परमगुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा, रविवार दिनांक 18/ 12 /2022 पासून शनिवार दिनांक 24/12/2022 अखेर 7 दिवस संपन्न होणार असून, पूज्य परमगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव मुख्यदिवशी म्हणजेच ,शनिवार दिनांक 24/ 12 /2022 रोजी दुपारी 



12:00 वाजता, श्रींचे मुख्य मंदिरात संपन्न होणार आहे .श्रीक्षेत्र नृसिंह वाडी येथे संपन्न होणाऱ्या, परमगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रींचे मंदिरात होणारे कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.- सकाळी पहाटे5:00 वाजता काकड आरती, सकाळी 7:00 वाजता लघुरुद्राभिषेक व श्रीमत गुरुचरित्र पारायणे, दुपारी 12:30 वाजता श्रींचे चरण कमलावर महापूजा, दुपारी 3:00 वाजता पवमान पंचसुक्तांचे पठण, दुपारी 4:00 वाजता, वेदशास्त्र संपन्न दिलीप शास्त्री वामन उपाध्ये (नृसिंहवाडी )यांचे पुराण, सायंकाळी 5:00 वाजता ह. भ. प. श्री. लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी , पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी 7:30 वाजता धूप -दीप-आरती व पालखी सोहळा, रात्री 10:00 वाजता शेजारती होईल. मंगळवार दिनांक 20/12/2022 रोजी सकाळी 8:00 वाजता, श्रींचे मुख्य मंदिरात *दत्तयाग* संपन्न होणार आहे. तरी दत्तभक्त व भाविकांनी या परम गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा व जन्मोत्सवानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्रीक्षेत्र नृसिंहवाडी दत्त देवस्थान समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top