*सांगलीत आज लव्ह जिहाद आणि धर्मांतर घटने विरोधी कडक कायदा होण्यासाठी, 24 डिसेंबरला निघणाऱ्या नियोजित हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी हिंदूनिष्ठ संघटनांची बैठक संपन्न--*

0

 *सांगलीत आज लव्ह जिहाद आणि धर्मांतर घटने विरोधी कडक कायदा होण्यासाठी, 24 डिसेंबरला निघणाऱ्या नियोजित हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी हिंदूनिष्ठ संघटनांची बैठक संपन्न--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी)* 


सांगलीत आज महाराष्ट्रात होत असलेल्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर घटनेच्या विरोधी कडक कायद्यासाठी, 24 डिसेंबरला निघणाऱ्या प्रस्तावित हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी एक बैठक संपन्न झाली.

लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यामुळे हिंदू समाजाला कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक स्तरावर मोठी हानी होत आहे. हिंदू युवती आणि महिला यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतरविरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदू जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १० डिसेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

या प्रसंगी माजी आमदार श्री. नितीन शिंदे,  भाजपच्या नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, माजी महापौर आणि भाजपच्या नगरसेविका सौ. संगिता खोत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव श्री. पृथ्वीराज पवार, सौ. सविता मदने, भाजपच्या नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, बजरंग दलाचे मिरजतालुका संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांच्यासह राष्ट्रसेविका समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, हिंदू एकता आंदोलन यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘काही व्यायामशाळा, कला प्रशिक्षण देणार्‍या संस्था, नृत्यप्रशिक्षण देणार्‍या संस्थामधून हिंदू युवतींना फूस लावण्याचे काम चालू आहे. मी रहात असलेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्येही माझ्याकडे ‘लव्ह जिहाद’च्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तरी अशा प्रकारे हिंदू युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या ‘लव्ह जिहादीं’ना फाशीची शिक्षाच होणे आवश्यक आहे.’’ श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून असे प्रकार करणार्‍यांना आर्थिक पुरवठा कोण करते याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, ‘ईडी’ यांच्याकडून अन्वेषण झाले पाहिजे.’’

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते तशा कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.’’

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top