*सांगली जिल्ह्यातील सुमारे 447 ग्रामपंचायतीसाठी 16951 अर्ज दाखल झाले असून, वाळवा तालुक्यातून विक्रमी अर्ज दाखल* .

0

 *सांगली जिल्ह्यातील सुमारे 447 ग्रामपंचायतीसाठी 16951 अर्ज दाखल झाले असून, वाळवा तालुक्यातून विक्रमी अर्ज दाखल* . *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 सांगली जिल्ह्यातील सुमारे 447 ग्रामपंचायतीच्या 1588 प्रभागातील सरपंच पदासह 4656 जागांसाठी 16 हजार 951 अर्ज सध्या दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सुमारे 2482 अर्ज दाखल झाले असून ,सदस्य पदासाठी 16951 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून ,सर्वाधिक म्हणजे सरपंच पदासह सदस्य पदांसाठी 3672 अर्ज दाखल झाले असून, जिल्ह्यातील सर्व अर्जांची छाननी, सोमवारी 5 डिसेंबर 2022 रोजी होणार असून, बुधवार 7 डिसेंबर 2022 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र ,उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार असून ,एकमेकावर राजकीय आरोप प्रत्यारोप हे केले जाऊन, ग्रामपंचायतची निवडणूक रंगतदार वळणावर येईल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक असणाऱ्या प्रत्येक गावात विकास कामावर उमेदवारांनी चर्चा करणे, त्याप्रमाणे वचननामा प्रसिद्ध करणे, संबंधित पात्र उमेदवारांचे पॅनल तयार करणे या बाबी अपेक्षित आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top