*सीमावर्ती भागातील 845 गावासाठी महाराष्ट्र शासन पॅकेज देणार असल्याचे प्रतिपादन- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.*

0

 *सीमावर्ती भागातील 845 गावासाठी महाराष्ट्र शासन पॅकेज देणार असल्याचे प्रतिपादन- महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


कर्नाटकमध्ये असणाऱ्या सीमावर्ती मराठी भाषिक 845 गावांसाठी महाराष्ट्र शासनाकडून पॅकेज देण्याची जोरदार तयारी चालू असून, लवकरच  मुंबई येथे बैठक घेणार आहे, त्याबरोबरच महाराष्ट्र शासनातर्फे कर्नाटकामधील सीमावर्ती  845 मराठी भाषिक गावांसाठी, ठोस पॅकेज देण्याचा निर्णय घेतला जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील शनिवारच्या पत्रकार परिषदेत केले. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत सध्या सुनावणी सुरू असून, मी स्वतः आणि शंभूराजे देसाई यांनी, कालच शासनाच्या वकिलांशी एक तास चर्चा केली असून, महाराष्ट्र शासनाकडून लागेल ती मदत करण्याचे खंबीर आश्वासन दिले आहे .कर्नाटकामधील 845 सीमावर्ती गावामध्ये महाराष्ट्र शासनाने मार्फत मराठी शाळांसाठी निधी देता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू असून सातबारा मराठीतून मिळावा तसेच रोडवरती मराठीतील लिहिलेले दगड असावे अशा आमच्या मागण्या आहेत. कर्नाटक राज्यांमध्ये भाजपचे सरकार जरी असले ,तरी तेथील मुख्यमंत्री हे तेथील लोकभावना पाहून बोलत असतात, त्याचप्रमाणे आम्ही पण महाराष्ट्राच्याच बाजूने बोलणारच आहोत. नुकताच सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी जत जवळच्या 45 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेऊन, त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आखली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top