व्हनाळीत संजय बाबा घाटगे गटच ठरला "भारी"...!

0

 व्हनाळीत संजय बाबा घाटगे गटच ठरला "भारी"...!


- ग्रामपंचायत निवडणुकीत श्री. अंबाबाई महाविकास आघाडीची एकहाती सत्ता.


- विरोधी गट  राजर्षी छत्रपती शाहू समविचारी परिवर्तन ग्रामविकास आघाडीला केवळ एकच जागा.


- सरपंचपदी दिलीप रामचंद्र कडवे यांची निवड. 


-  घाटगे गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजी करत  विजयी जल्लोष साजरा केला.



 *कोल्हापूर* : _कागल(व्हनाळी)-जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी- नंदकुमार तेली._


गेल्या ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून कागल तालुक्यातील व्हनाळी या गावात मा.आमदार संजयबाबा घाटगे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही घाटगे गटाने १० पैकी ०७ जागा जिंकून विजयाची   परंपरा कायम राखण्यात यश मिळवले आहे.  तर स्थानिक पातळीवरील आघाडी अंतर्गत घाटगे गटाला मुश्रीफ गटाची ०१ व मंडलिक गटाची ०१ अशा ०२ जागांचा पाठिंबा मिळाला असल्याने घाटगे गटाची सदस्य संख्या ०९ वर पोहोचली आहे. तर

विरोधी राजर्षी छत्रपती शाहू  समविचारी परिवर्तन ग्रामविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. तसेच थेट जनतेतून घाटगे गटाचेच  दिलीप रामचंद्र कडवे यांची सरपंचपदी निवड झाली. यानंतर

घाटगे गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व आतषबाजी करत विजयी जल्लोष साजरा केला.



शिंदे गट - ठाकरे गट - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र...!


गाव पातळीवरील आघाडीमध्ये मुश्रीफ गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, मंडलिक गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट. व माजी आमदार संजय बाबा घाटगे म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. अशी आघाडी व्हनाळी या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जुळून आल्याचे चित्र पहावयास मिळाले.



निवडणुकीचा सविस्तर निकाल असा......


सरपंच : - दिलीप कडवे- ११२८, दिनकर वाडकर- ८९२.


 प्रभाग क्रमांक ०१ - (एकूण मतदान ७१८) पुरुष सदस्य - संजय दिनकर वाडकर- ३८०, सागर पाटील- ३३८.      


मागासवर्गीय महिला सदस्य- वर्षाराणी धनाजी कांबळे- ४३३, सुनिता कांबळे -२८० .


महिला सदस्य- अश्विनी राजेंद्र जांभळे- ४४६, जयश्री अमोल- जाधव- २७०.


प्रभाग क्रमांक ०२ - (एकूण मतदान - ६४७ ) 

 - पुरुष सदस्य- ओंकार पांडुरंग कौंदाडे - ५४०, दत्तात्रय कुळवमोडे - १०४. 


 महिला सदस्य - कविता पोपट वाडकर - ४३८, सुमन रांगोळे - २०३. 


प्रभाग क्रमांक ०३ - (एकूण मतदान - ६६५ ) - पुरुष सदस्य - अरुण नामदेव पवार - ३६९ , राजेंद्र नामदेव वाडकर - २८७. 


महिला सदस्य - इंदुबाई शामराव दंडवते -४७५, स्मिता पाटील - १७८.


- यांची झाली बिनविरोध निवड :

 

प्रभाग क्रमांक -०२ व ०३ मधील ग्रामपंचायत सदस्य निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये अनुक्रमे- सुरेश शिवाजी गुरव व क्रांती रविंद्र वाकोडे यांचा समावेश आहे.


- ओंकार पांडुरंग कौंदाडे विक्रमी मतांनी विजयी.


ओंकार यांचे चुलते बाळासाहेब कौंदाडे यांनीही यापूर्वी अनेक वर्षे सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्याच कार्याची प्रेरणा घेऊन ओंकार याने गावामध्ये सामाजिक कार्याची परंपरा सांभाळली आहे. आणि आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६४७ पैकी ५४० अशी विक्रमी मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठा विजय मिळवला आहे. जनतेने मी केलेल्या कार्याची पोहोचपावती मला दिली आहे. अशा भावना "जनप्रतिसाद न्यूज" शी बोलताना यावेळी ओंकार कौंदाडे यांनी व्यक्त केल्या.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top