*सांगलीतील प्रसिद्ध आमराई बागेतील हुबेहूब दिसणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिकृती गायब ---*

0

 *सांगलीतील प्रसिद्ध आमराई बागेतील हुबेहूब दिसणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिकृती गायब ---*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी)* 


 सांगलीतील आकर्षण असणाऱ्या प्रसिद्ध आमराई बागेतील, सुशोभीकरणासाठी बसवलेल्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध असलेल्या आमराई बागेत सुशोभीकरणासाठी बसवलेल्या प्राण्यांच्या फायबरच्या प्रतिकृती विना निविदा बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

 सोमवारी किंवा मंगळवारी सदरहू सुशोभीकरणाअंतर्गत बसलेल्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती गायब झाल्या आहेत. सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सदरहूबाबतीत, सर्वकश चौकशी करण्याची मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे . दरम्यान सांगलीतील प्रसिद्ध असणाऱ्या आमराई बागेत बसवण्यात आलेल्या हुबेहूब प्राण्यांच्या प्रतिकृती या चाचणी घेण्यासाठी संरक्षक जाळी सह बसवल्या होत्या. आता आम्ही याची रितसर निविदा प्रक्रिया पूर्ण करून, त्या परत बसवणार आहोत, शिवाय सदरहू प्राण्यांच्या असणाऱ्या प्रतिकृती संदर्भातील कोणतेही बिल ठेकेदाराला यापूर्वी अदा केलेले नसून, यात कोणताही गैरप्रकार घडलेला नसल्याचे आमराई बागेचे उद्यान अधीक्षक गिरीश पाठक यांनी सांगितले. सांगलीतील आमराई बागेत  यापूर्वी अनेक सुशोभीकरणाची कामे झाली असून, त्याच्या गैरकारभाराबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारीही केल्या होत्या. नागरिकांनी आपापल्या भागातील संशयास्पद कामांचीहि माहिती महानगरपालिकेकडे विचारून जाब विचारला पाहिजे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top