*कोल्हापुरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, भारतात तिसरे व राज्यात पहिले---*

0

 *कोल्हापुरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, भारतात तिसरे व राज्यात पहिले---*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 कोल्हापुरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला, एज्युकेशन टुडे यांच्याकडून डे कम बोर्डिंग स्कूल श्रेणीमध्ये, बोर्ड भारतातून तिसरा व महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक चा पुरस्कार मिळाला असून ,सदरहू पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चे विश्वस्त विनायक भोसले यांनी, इंडिया स्कूल मेरिट अवॉर्ड सोहळ्यात तो पुरस्कार स्वीकारला आहे. भारतातील शिक्षण क्षेत्रात स्कूल श्रेणीत नामवंत व प्रख्यात असणाऱ्या शाळांना तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या संस्थांना हे पुरस्कार देण्यात येतात. नुकताच एज्युकेशन टु डे चे कार्यकारी संचालक अनिल शर्मा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन संजय घोडावत यांनी 2010 मध्ये स्कूलची उभारणी करून, शैक्षणिक क्षेत्रात एक मौलिक शिक्षणाचा सोयीसुविधांचा आधारस्तंभ निर्माण केला गेला आहे. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ची राज्यातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकासाठी झालेली निवड ,ही भारतातील सर्वोत्कृष्ट 20 शाळांमधून झाली आहे. ही एक अतिशय गौरवास्पद बाब असल्याची गोष्ट आहे .संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मध्ये सध्या 400 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, पहिली ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रम येथे शिकवला जातो. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला निवासी सुविधा, उत्तमरीत्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला या प्रगतीपथाच्या उंचीवर नेणाऱ्या प्राचार्य सस्मिता मोहंती,  सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top