*महाराष्ट्र राज्यात साध्या नवीन एस.टी. बस मध्ये, खास पुशबॅक बकेट आसने असलेली व्यवस्था उपलब्ध होणार.----*

0

 *महाराष्ट्र राज्यात साध्या नवीन एस.टी. बस मध्ये, खास पुशबॅक बकेट आसने असलेली व्यवस्था उपलब्ध होणार.----*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 महाराष्ट्र राज्यामध्ये एस.टी. महामंडळाने, राज्यातील मोठा प्रवासी वर्ग सध्या साध्या गाड्यातून प्रवास करत असतो हे लक्षात घेऊन, नवीन लाल रंगाच्या साध्या एस.टी. बस मध्ये, खास पुशबॅक बकेट आसने बसवून ,प्रवास आनंददायी करता येण्यासाठी, एस.टी. महामंडळाने, सदरचा निर्णय घेतला असून, ही सुविधा महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना, नेहमीच्या साध्या एस.टी. भाड्याच्या दरात उपलब्ध होणार आहे. नुकतेच एस.टी. महामंडळाने या योजनेला अंतिम स्वरूप देऊन, 2000 बसेस खरेदी प्रक्रियेची सुरुवात केली आहे. सर्वसाधारणपणे जून 2023 पर्यंत 3200 साध्या बस मध्ये, सदरहू आसन व्यवस्था असलेली एस.टी. बसेस महामंडळाच्या ताब्यात दाखल होतील. महाराष्ट्र राज्यातील एस.टी. महामंडळाकडे ,सध्या साध्या एस.टी. बसची संख्या अपुरी असल्यामुळे, शिवाय एस.टी. महामंडळाने, एस.टी.चा सध्याचा तोटा कमी करण्यासाठी, विद्युत बस गाड्या खरेदी करण्याबरोबर, सदरहू बस खरेदी करण्याचा निर्णय पण घेतला आहे. सध्याच्या पर्यावरण पूरक नियमानुसार बी. सिक्स. मॉडेल चे इंजिन असलेली, 11 मीटर लांबीची विद्युत बस आहे. एस.टी. बस गाड्यांसाठी लागणाऱ्या इंजिनचेसीसची खरेदी करून, महामंडळाच्या कार्यशाळेतच सदरहू गाड्यांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. राज्य शासनाकडून सदर बस खरेदीसाठी 700 कोटींचा निधी मिळणार असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाकडून, सदर बसेस या लांब पल्ल्याच्या मार्गावर म्हणजेच ग्रामीण भागातून शहरी भागांकडे चालवण्यात येणार आहेत. या सर्व बसेस एसटी महामंडळाकडे जून 2023 पर्यंत प्रस्तावित कार्यासाठी समाविष्ट होतील असे नियोजन सध्या चालू आहे असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top