*कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरामध्ये, सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न--*

0

 *कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरामध्ये, सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न--* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात, आज लाखो दत्त भाविकांच्या उपस्थितीत, सायंकाळी पाच वाजता, दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी संध्याकाळी साडेचार वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे, पूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरातून ,मुख्य मंदिरात आगमन झाले. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त जन्मोत्सव सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यापूर्वी आढावा बैठक घेतली होती.



 नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने, मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या दत्त भाविकांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, नृसिंहवाडी क्षेत्रातील परिसरातील स्वच्छता व आरोग्यबाबतीत काटेकोरपणे दक्षता घेऊन नियोजन केले होते. यापूर्वी झालेल्या बैठकीत देखील, दत्त जयंती निमित्त होणाऱ्या प्रचंड दत्त भाविकांच्या गर्दी बाबतीत सविस्तर चर्चा होऊन, व्यवस्थित नियोजन करण्यासंबंधी आराखडा तयार केला होता. यंदाच्या वर्षीचा नृसिंहवाडी येथील दत्त जयंती सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी, तसेच येणाऱ्या दत्त भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनास काही सूचना केल्या होत्या. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यापूर्वीच्या बैठकीस सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच पूनम जाधव, श्री दत्त देवस्थान समिती ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव जेरे, सेक्रेटरी संजय पुजारी ,आनंद धनवडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल पुजारी, विकास कदम ,रमेश सुतार, तानाजी निकम ,मंगला खोत ,विद्या कांबळे ,ग्रामविकास अधिकारी बी. एल. टोणे, मदन मधाळे यांच्यासह देवस्थान समितीचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते. आज सकाळपासूनच दत्त भाविकांची गर्दी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे, मोठ्या प्रमाणात बघावयास मिळाली. दत्त जन्माच्यावेळी तर दत्त भाविकांची फार मोठी गर्दी झाली होती. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रवेशद्वाराच्या कमानीपासून आत जाताना, प्रचंड फार मोठी कसरत करावयास लागत होती  श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील परिसर संपूर्ण दत्तमय होऊन गेला होता. जिकडे पहावे तिकडे दत्तनामाचा दत्त भाविक गजर करीत होते. एकंदरीतच यंदाच्या वर्षीचा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा, अतिशय अपूर्व असा नयन मनोहर स्वरूपात व आनंदात साजरा झाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top