*सांगलीत, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, महाआरोग्य शिबिरा अंतर्गत, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न--*

0

 *सांगलीत, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,  महाआरोग्य शिबिरा अंतर्गत, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री  मा .जयंत पाटील साहेब  यांच्या वाढदिवसानिमित्त,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली , अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीरा अंतर्गत  आज १०  जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ८१ वी बँच पार पडली , सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.      यावेळी पेशंटच्या भेट प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजेंद्रसिह पाटील,  चेअरमन शिवसागर साखर कारखाना बेळगांव व मा. सुभाष तोडकर ,  मा. शासकीय लेखापरीक्षक उपस्थित होते.

    तसेच कुपवाड शहर अध्यक्ष संजय तोडकर ,सांगली शहर महिला अध्यक्षा अनिता पांगम ,मिरज महिला अध्यक्षा वंदना चंदनशिवे , मा. संध्या आवळे ,मा. सुरेखा हेगडे , प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव,  , आरोग्यदूत मा . उमर गवंडी , मा. मुन्ना शेख ,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख सचिव व  विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ शुभम जाधव , निलेश शहा,  रावसाहेब नलवडे , अजीम मुल्ला, गणेश काळे  यांनी  केला. सांगलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या मोफत राबवलेल्या मोतीबिंदू ऑपरेशनची, गरिबांसाठी फार मोठी मदत होत आहे. गेले काही वर्षे सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने विविध उपक्रमा अंतर्गत अभियाने, गोरगरीब जनतेच्या व लोकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असतात.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top