*कोल्हापूर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने, बिलावल भुट्टो यांच्या विरोधात पाकिस्तानचा झेंडा व बिलावल भुट्टो यांचा फोटो जाळून जोरदारपणे निदर्शने---*

0

 *कोल्हापूर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने, बिलावल भुट्टो यांच्या विरोधात पाकिस्तानचा झेंडा व बिलावल भुट्टो यांचा फोटो जाळून जोरदारपणे निदर्शने---* 



 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


कोल्हापूर मध्ये आज दिनांक 17/ 12/ 2022 रोजी, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी न्यूयॉर्कमध्ये ,पत्रकार परिषदेत सर्व मर्यादा ओलांडल्या आणि देशाचे लोकप्रिय  पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो ने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरुद्ध तीव्र निदर्शने करण्यात आली. 



भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी एकत्र येत त्यांनी बिलावल भुट्टोच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. बिलावल भुट्टोचे करायचे काय खाली डोके वर पाय, बिलावल भुट्टो कोण रे पायताण मारा दोन रे, जलादो जलादो पाकिस्तान जलादो, एवढा मोठा हिदुस्तान खड्यात गेला पाकिस्तान, मूरडा बात पाकिस्तान मुरडा बाड, भारत माता कि जय, नरेंद्रभाई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यानंतर कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा व बिलावल भुट्टो चा फोटो जाळण्यात आला. पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करून निषेधाची बोंब मारण्यात आली. 

यावेळी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांनी याविषयी तीव्र शब्दात आपला निषेध नोंदवला. 

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर भारतामध्ये विकासाची गंगा आणली. सर्वसामान्य जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टीबद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण केल्या त्यामुळे भारतातील विरोधक त्याचबरोबर देशाला घातक ठरणारे आपले शेजारी पाकिस्तान, चीन हे भारताला घाबरू लागले असून कालचे वक्तव्य हे नरेंद्र मोदिजी हे जगाचे नेते होत आहेत, G-20 चे अध्यक्ष झाले म्हणून हे पोटशूळ सर्वांच्या पोटात उठले आहे.  त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन २०२४ मध्ये दाखवून दिले पाहिजे कि, भारताच्या विरोधात असणारे हे सर्व घटक जगाच्या, लोकशाहीच्या विरोधातील लोक एकत्र होत आहेत त्यांना संपवण्यासाठी भारताला विश्वसमृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एक होऊन यासाठी नरेंद्र मोदिजी यांच्यापाठी राहिले पाहिजे असे सांगितले. 

याप्रसंगी बोलताना प्र.का.सदस्य महेश जाधव म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा 135 कोटी देशवासीयांना अभिमान आहे. मोदिजी हे जगाचे नेतृत्व करत आहेत. आकस बुद्धीने बिलावल भुट्टोने हे वक्तव्य केले असून भारत देशावर वाकड्या नजरेने बघणाऱ्या, देशद्रोही, आतंकवादी यांच्यासाठी ते मौत का सोदागर ठरत असल्याचे सांगत अशा घटनांचा तीव्र निषेध करत असल्याचे सांगितले. 

यावेळी मारुती भागोजी, प्रदीप उलपे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, तोफिक बागवान, प्रदीप पंडे, रवींद्र मुतगी, विवेक कुलकर्णी, विजय खाडे पाटील, महेश यादव, नजीर देसाई, अतुल चव्हाण, माणिक पाटील-चुयेकर, हर्षांक हरलीकर, सुनील पाटील, विवेक वोरा, बालाजी चौगुले, अमेय भालकर, प्रसाद पाटोळे, विद्या बंनचोडे, सुजाता पाटील, किशोर घाटगे,  अभिजित शिंदे, ओमकार खराडे, प्रवीणचंद्र शिंदे, गिरीश साळोखे, अमर साठे, प्रथमेश मोरे, प्रकाश घाटगे, मानसिंग पाटील, अभिजित शिंदे, रहीम सनदी, संतोष सुतार, राहुल घाटगे, विजय दरवान, रमेश दिवेकर, विशाल शिराळकर, केशव तिरोडकर, राजाराम परिट, नाजीम आत्तार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top