*विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे कालमर्यादेत हटवा व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा.-- सुनील घनवट, विशाळगड रक्षण व अतिक्रमण विरोधी कृती समिती.*

0

 *विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे कालमर्यादेत हटवा व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा.-- सुनील घनवट, विशाळगड रक्षण व अतिक्रमण विरोधी कृती समिती.*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* ) 


विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला, तसेच या बैठकीनंतर वनविभागाने त्वरित अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला, याबद्दल हिंदु जनजागृती समिती प्रशासनाचे अभिनंदन ! यात प्रारंभीच्या काळात जिल्हाधिकार्‍यांसमवेत ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’ची बैठक झाली. अतिक्रमण झाले आहे, याविषयी अधिकृत पुरावे दिले गेले. हे पुरावे त्या वेळी जिल्हाधिकारी, पुरातत्व खाते, तहसीलदार, ग्रामपंचायत या सर्वांनीही ते मान्य केले होते. असे असूनही ती अतिक्रमणे अद्यापर्यंत का काढली गेली नाहीत ? त्यात दिरंगाई का झाली ? प्रशासनाकडून पावसाळ्याचे कारण सांगून अतिक्रमण हटवण्यात आले नाही. त्यामुळे यापुढील काळात तरी प्रशासनाने शिवभक्त, गडप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्या भावनांचा अंत होण्याची वाट पाहू नये. विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हे कुणाच्याही दबावाला बळी न पडता हटवावीत. त्याच समवेत ज्या अधिकार्‍यांच्या कालावधीत ही अतिक्रमणे झाली, जे या अतिक्रमणांना दोषी आहेत, त्या सर्व अधिकार्‍यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’चे प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांनी केली आहे. 

पत्रकार परिषद, घंटानाद आंदोलने, निवेदने व विविध माध्यमांतून उभारला विशाळगडाचा रणसंग्राम !

विशाळगडावरील अतिक्रमणांच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. प्रथम 16 मार्च 2021 या दिवशी कृती समितीने पहिल्यांदा कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन गडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्या यांची दुरवस्था पुराव्यांसह उघड केली. यानंतर हा विषय जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी आंदोलने; जिल्हाधिकारी-पुरातत्व विभाग यांच्या समवेत बैठका; कोल्हापूर जिल्ह्यात, तसेच महाराष्ट्र स्तरावरही विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी; केंद्रीय मंत्र्यांना, तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक-कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन; विधानसभा अधिवेशनात आवाज उठवण्यासाठी विविध आमदार, मंत्र्यांच्या भेटी या माध्यमांतून सातत्याने हा विषय लावून धरत जागृती करण्यात आली. समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विशाळगड येथील अतिक्रमणधारकांना नोटिसा काढाव्या लागल्या आणि आता होणारी कारवाई हे समितीच्या आंदोलनाचे एक फलित आहे, असे म्हणावे लागेल. अन्य गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबतही आम्ही शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आता अन्य गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही त्वरित हटवावीत. यासाठी शिवभक्तांना पाठपुरावा करावा लागू नये, हीच सरकारकडून आमची अपेक्षा आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top