देशातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या कायद्यासाठी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत लढाई लढणार- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे* प्रतिपादन

0

 *देशातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याच्या कायद्यासाठी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत लढाई लढणार- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचे प्रतिपादन 

 
 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* )


 सध्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या कायद्यासाठी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत लढाई करणार असल्याचे संकेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभू राजू शेट्टी यांनी दिले आहे. आज झालेल्या पुण्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, देशभरातील शेतकरी नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या एक दिवसाच्या कार्यशाळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी बोलत होते .भारतातील शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी त्याला कायद्याने हमीभावाचे संरक्षण देण्याची आवश्यकता असून, स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारसी मांडल्या आहेत, त्या तत्काल लागू कराव्यात असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले आहे .केंद्रातील सरकारने यापूर्वी दीडपट हमीभावाचे आश्वासन दिले होते, ते अध्यापि पूर्ण केले नसल्याने, त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने तत्काल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे .बळीराजा हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असून, निसर्गाचे चक्र सध्या पूर्णतः कोलमडले असल्याने, शेती व्यवसायात सुद्धा शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसत आहे .त्याचप्रमाणे अन्नधान्यांच्या बाबतीतही, केंद्र सरकारने किमती जर स्थिर केल्या तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना, सरकारला व परिणामी ग्राहकांना देखील होईल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले .सध्या शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मोर्चे काढून, सरकारला भेटीस धरावे लागत आहे. सरकारनं एकदा हमीभावाचा कायदा करून ,त्याची अंमलबजावणी केलीतर शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय मिळेल असे प्रतिपादन राजू शेट्टी यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top