*निपाणी येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे, लव जिहाद्यांना रोखण्यासाठी ,राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी--*

0

 *निपाणी येथे हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे, लव जिहाद्यांना रोखण्यासाठी ,राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 महाराष्ट्रातील मुंबईतील हिंदू तरुणी ‘श्रद्धा वालकर’ हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह-जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय ‘निधी’ या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी 13 डिसेंबर या दिवशी सकाळी 11  वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, बसस्थानकाजवळ, निपाणी, कर्नाटक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.या प्रसंगी निपाणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. निता बागडे, भाजपचे नगरसेवक श्री. संतोष सांगावकर, माजी नगरसेवक श्री. विजय टवळे, भाजपचे श्री. रवी इंगवले आणि श्री. शांतीनाथ मुतुकडे, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, इस्कॉनचे श्री. शिवाजी आजरेकर आणि श्री.उदय मोरे, वाल्मिकी समाजाचे श्री. बाळू तराळ, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके आणि श्री. राजू कोपर्डे, ‘सद्गुरु तायक्वांदो अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक श्री.  बबन निर्मळे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनिल बुडके, योगेश चौगुले, गौतमेश तोरस्कर उपस्थित होते. या वेळी ‘हर हर महादेव’ ‘चंडी, दुर्गा, काली हो !’, ‘लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या !’, ‘लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !’ अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा. राज्यात युवती आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण पहाता,  बेपत्ता होण्यामागे काही षड्यंत्र नाही ना, या मागे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही गृहखात्याने चौकशी करावी, अशी आम्ही मागणी करत आहोत.’’ या वेळी श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, ‘सद्गुरु तायक्वांदो अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक श्री.  बबन निर्मळे, तसेच सनातन संस्थेच्या श्रीमती अल्का पाटील यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले. 

*क्षणचित्रे* 

१. गळगता या गावातील प्रशिक्षण वर्गातील युवक, तसेच नांगनूर, जत्राट या गावातून धर्मप्रेमी उपस्थित होते.

२. आंदोलन चालू असतांना अनेक जण चौकात थांबून विषय ऐकत होते.


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top