*जिद्द चेस अकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात प्रारंभ,मानांकित आघाडीवर,168 नामांकित बुद्धिबळपटूंचा सहभाग.*

0

 *जिद्द चेस अकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात प्रारंभ,मानांकित आघाडीवर,168 नामांकित बुद्धिबळपटूंचा सहभाग.* 


कोल्हापूर:- मिलिंद पाटील.रविवार दि.15 जानेवारी - रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल,  फुलाची शिरोली, हायवे लगत,कोल्हापूर येथे जिद्द चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या खुल्या सोळाशे गुणांकनाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेस आज दिमाखात प्रारंभ झाला.


कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने जिद्द चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जीएसटी सहाय्यक आयुक्त व प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू जयांकुर चौगले,  आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू अनिश गांधी, प्रसिद्ध बुद्धिबळ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे या मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, ऋतुराज भोकरे,निहाल मुल्ला,तुषार शर्मा, अभिजीत चव्हाण, सुशांत कांबळे व सुयश जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.पुणे, सातारा, फलटण,सोलापूर, बार्शी रत्नागिरी,बेळगाव निपाणी व स्थानिक जयसिंगपूर इचलकरंजी व कोल्हापूर येथील नामवंत १६८ बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.यापैकी जवळपास ८० बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.


आज झालेल्या सहाव्या फेरी अखेर अग्रमानांकित कागल चा निहाल मुल्ला, चौथा मनांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार,सातवा मानांकित कोल्हापूरचा शर्विल पाटील, विसावा मानांकित पुण्याचा हर्षल पाटील व एकविसावा मानांकित रत्नागिरीचा वरद पेठे हे पाच जण गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.दिशा पाटील जयसिंगपूर,तृप्ती प्रभू कोल्हापूर, रिया पोद्दार इचलकरंजी, आदित्य कोळी सांगली, श्रीकांत 

 सांगली,ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर,आदित्य चव्हाण सांगली व सदानंद चोथे सांगली हे आठ जण पाच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.राजू सोनेच्या सांगली, विवान सोनी इचलकरंजी, प्रथमेश काशीद पुणे, शौर्य बागडिया इचलकरंजी, शंकर साळुंखे सोलापूर, अभय भोसले जयसिंगपूर व प्रज्वल मुधाळे हुपरी हे सातजण साडेचार गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top