श्री राम मंदिरासाठी "ग्रॅनाईट" अर्पण.*

0

 *श्री राम मंदिरासाठी "ग्रॅनाईट" अर्पण.* 


- भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे मंदिर उभारणीत मदतीचा हात.कोल्हापूर : ("जनप्रतिसाद न्यूज " - विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)


सामाजिक बांधिलकी जोपासत

भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे घोसरवाड येथील श्री राम मंदिर उभारणीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व फरशी व ग्रॅनाईट अर्पण करण्याचा "मानस" केला आहे. त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो. या उदात्त हेतूने उत्तर भारतीय मोर्चातर्फे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी मदत करण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी मंदिरासाठी लागणारे सर्व ग्रॅनाईट व फरशी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर भारतीय समाजातील प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक एकत्र आले आहेत. त्यांच्या शिष्टमंडळांने ज्या जागेवर मंदिर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मंदिर उभारणीच्या सुरू असणाऱ्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. आणि त्यासाठी लागणाऱ्या फरशी व ग्रॅनाईट देण्यात संदर्भात समाज बांधवांनी एकत्रित निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी मंदिर उभारण्यात येणाऱ्या आणखी काही बाबीबद्दल गावकऱ्यांच्या कडून माहितीही जाणून घेतली. त्याचप्रमाणे मंदिर उभारणीत येणाऱ्या आणखी कोणत्याही मदतीला सढळ हाताने मदत करण्यासाठी कायम तत्पर असल्याची ग्वाही, उत्तर भारतीय मोर्चातर्फे देण्यात आली आहे. 
 यावेळी भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अजय सिह, निरंजन झा, ब्रिजेश उपाध्याय, उपदेश सिह, रामसिंग मोरया, प्रमोद मोरया,जगन्नाथ मिश्रा, राजधर तिवारी, राहुल चौबे यांच्यासह पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी उत्तर भारतीय मोर्चातर्फे मंदिर उभारणीत मदतीचा हात पुढे केल्याबद्दल व सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानलेPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top