प्रजासत्ताक दिनानिमित्त स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा 'आप'तर्फे सत्कार...!

0

 प्रजासत्ताक दिनानिमित्त स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा 'आप'तर्फे सत्कार...!कोल्हापूर प्रतिनिधी: मिलिंद पाटील.


प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने पंचगंगा घाट स्मशानभूमीत कोविड काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संदीप इंचनाळकर होते. उद्यमनगर येथील 'आप' कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आरोग्य निरीक्षक महेश भोसले, रवी कांबळे, अनिल बनगे, विजय पुजारी, सुनील कांबळे, सदाशिव कांबळे, प्रसाद सरनाईक, करण बनगे, सूरज कांबळे, रोहित ढाले, तुलसीदास कांबळे, विजय पुजारी यांचा सत्कार पार पडला.


यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अमरजा पाटील, अभिजित कांबळे, राकेश गायकवाड, सूरज सुर्वे, दिलीप पाटील, शरद पाटील, डॉ. सुरेश पाटील, संजय नलवडे, दुष्यंत माने, विजय हेगडे, आदम शेख, लाला बिरजे, दिग्विजय चिले, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top