*भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देणार्‍या तब्बल ५ हजार शेतकरी नागरिकांना दररोज करण्यात येतंय मोफत झुणका भाकरीचं वाटप.*

0

 *भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देणार्‍या तब्बल ५ हजार शेतकरी नागरिकांना दररोज करण्यात येतंय मोफत झुणका भाकरीचं वाटप.* 

 

कोल्हापूर प्रतिनिधी: मिलिंद पाटील.  पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया भीमा कृषी प्रदर्शनात सलग १५ व्या वर्षी मोफत झुणका-भाकर  वाटप उपक्रम राबवण्यात येतोय. लांब अंतरावरून कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना तब्बल ५ हजार झुणका भाकरीचं वाटप भागिरथी महिला संस्थेच्यावतीनं करण्यात येतंय. आज महाडिक परिवारातील सदस्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते झुणका भाकरीचं वाटप करण्यात आलं.

  

भीमा कृषी प्रदर्शनाचं हे १५ वं वर्ष आहे. कृषी प्रदर्शनादरम्यान सलग चार दिवस प्रदर्शन पाहण्यासाठी येणार्‍या शेतकरी, महिला आणि नागरिकांसाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं झुणका भाकरी वाटपाचं आयोजन करण्यात येतं. या माध्यमातून लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांना मोफत आहार उपलब्ध व्हावा, हा भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांचा  उद्देश आहे. यंदा २६ जानेवारीला कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भीमा कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली. आज प्रदर्शनाच्या दुसर्‍याच दिवशी मंगलताई भिमराव महाडिक, साधनाताई महाडिक, मंगलताई महादेवराव महाडिक, इंद्रजित जाधव, महेश भोवले, प्रमोद हुदले, विक्रमनगर इथल्या अनमोल आणि महालक्ष्मी बचत गटाच्या सिमा पालकर यांच्या हस्ते आज झुणका-भाकरी वाटप करण्यात आलं. उन्हातून पायपिट करत आलेल्या शेकडो शेतकरी बांधव-भगिनी, शालेय विद्यार्थी यासह नागरिकांनी झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. बचत गटांच्या उत्पादनांना बळ देण्याच्या उद्देशानं देखील दररोज वेगवेगळया बचत गटांना पाच हजार झुणका-भाकरी बनवण्याचं काम भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक देत आहेत. या उपक्रमामुळं गरजू आणि कष्टकरी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर पोट भरल्याचं समाधान दिसून येतंय.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top