*जिल्हा बार असो. ची समन्वय बैठकीत कळे बार असो. ची कार्यकारणी जाहीर.*

0

 *जिल्हा बार असो. ची समन्वय बैठकीत कळे बार असो. ची कार्यकारणी जाहीर.*


प्रतिनिधी: मिलिंद पाटील.कळे न्यायालयाची स्थापना 8 एप्रिल 2017 रोजी झाली असून त्यानंतर कळे बार असो. ची कार्यकारणी स्थापनेबाबत एकमत होत नसलेने आज पर्यंत कार्यकारणी स्थापन झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा बार असो. पदाधिकारी, बार कौन्सिल सदस्य, जिल्हा बार असो. चे सर्व माजी अध्यक्ष यांनी दि. 16/2/2023 रोजी जिल्हा न्यायसंकुल मध्ये समन्वय बैठक घेतली. व उपस्थित कळे न्यायालयातील वकिला मध्ये समन्वय करून गेली 5 वर्षे प्रलंबित असलेला विषय संपुष्टात आणला. सदर बैठकी मध्ये सर्वांचे समन्वयाने एकमुखी कळे बार असो. संस्थापक संचालक मंडळ जाहीर करण्यात आले.यामध्ये अध्यक्ष म्हणून अँड. एम. एच. चावरे, उपाध्यक्ष अँड. शहाजी खोत, सचिव अँड. अरुण पाटील, सहसचिव अँड. विक्रांत पाटील, खजानीस अँड. प्रशांत पाटील, महिला प्रतिनिधी अँड.मालविका गोटखिंडीकर,कार्यकारणी सदस्य  अँड. राम माने, अँड. अभिजित गायकवाड, अँड. जगजीत अडनाईक, अँड. रमेश कांबळे, अँड. दिपाली सणगर अँड. शहाजी पाटील, अँड. अमोल नाईक, अँड. भरत पाटील, अँड. ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली. सदर समन्वय  बैठकीत कोल्हापूर जिल्हा बार असो. चे अध्यक्ष अँड. गिरीश खडके, बार कौन्सिल सदस्य अँड. विवेक घाटगे, सचिव अँड. विजय ताटे-देशमुख, माजी अध्यक्ष अशोक पाटील, अँड. अजित मोहिते, अँड. प्रशांत चिटणीस, अँड. प्रशांत शिंदे, अँड. प्रकाश मोरे , अँड. रणजित गावडे, अँड. सर्जेराव खोत, अँड. आबा पाटील, अँड. व्ही एच चावरे, अँड. एन बी माने, अँड अभिजित पाटील, आदी वकील उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top