पंचकल्याण लोकोत्सवातून पर्यावरण जनजागृतीची सर्व समावेशक व्यापक मोहीम सुरु होणार- विश्वस्त उदय सामंत.

0

पंचकल्याण लोकोत्सवातून पर्यावरण जनजागृतीची सर्व समावेशक  व्यापक मोहीम सुरु होणार- विश्वस्त उदय सामंत. 

प्रतिनिधी:- शैलेश माने.

कोल्हापूर - सिद्धगिरी कणेरी मठ येथे २० ते 26 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या पंचमहा भूत लोकोत्सव मध्ये झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या विचारवंत - साधूगण प्रयोगशील कार्यकर्ते शेतकरी यांच्या विचार मंथनातून  पर्यावरण विषयक जनजागृतीची आणि कृतीशील विविध उपक्रमाची सुरुवात होईल , नेमके हेच या कार्यक्रमाचे यश आहे. पूजनीय  काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेला गाव तालुका पातळीपासून कृतीशील समर्थन मिळेल. असा विश्वास या उपक्रमाचे प्रमुख संयोजक समन्वयक - विश्वस्त आणि महाराष्ट्र उद्योग आघाडीचे प्रमुख उदय सामंत यांनी व्यक्त केला .   

गत सात दिवस सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये झालेल्या विविध चर्चासत्रातून देशातील शास्त्रज्ञ -  विविध राज्याचे माननीय  राज्यपाल तसेच विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते राज्याचे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्री गण याच बरोबरीने प्रयोगशील शेतकरी आणि थेट बांधावर काम करणारे कल्पक युवा वर्ग या सर्वांच्या वैचारिक मंत्रातून एक समान धागा हा पर्यावरण जागृतीचा दिसून आलेला आहे. आणि सर्वच वक्त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर सातत्य राहावे अशी उपक्रम द्यावेत. असे सुचित केलेली आहे आणि हेच या कार्यक्रमाचे मुख्य यश आहे.या सात  दिवसांत व्यक्त  झालेल्या   विचारांचे पुस्तक रूपात संकलन करण्यासह या संदर्भाने विविध शिक्षण संस्थेतून पदवी पदविका असा "  पंच महाभूत सजगता " अभ्यासक्रम सुरू व्हावा , समाजातील सर्व स्तरापर्यंत जनजागृतीचे सातत्याने कार्यक्रम नियोजन करण्यासाठी  सिद्धगिरी मठ आपली मुख्य समन्वयकाची भूमिका बजावत राहील असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त करत लाखोच्या संख्येने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे जाहीर आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top