पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बालवर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी. - डॉ.प्रमोद सावंत.( गोवा मुख्यमंत्री.)

0

पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बालवर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी. -  डॉ.प्रमोद सावंत.( गोवा मुख्यमंत्री.)


प्रतिनिधी: शैलेश माने.


कोल्हापूर - आध्यात्मिक कार्याला समाजकार्याची जोड देण्याची मोठी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ पंचक्रोशीमध्ये संपन्न होत असलेल्या ' पंचमहाभूत लोकोत्सवातून 'युवा आणि बालवर्गामध्ये पर्यावरण विषयक निर्माण झालेली जाणिव ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमातून सातत्याने विकसित होईल ' हेच या  उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरेल 'अशा शब्दात आपल्या भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्या .  

सिद्धगिरी कणेरी मठ परिसरात या उपक्रमाच्या 'जल - आप वायू - तेज - आकाश ' या पंचतत्व  विभागाची पाहणी करून तसेच संत संमेलनात त्यांनी सहभाग घेतला . गोवा राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर  या संकल्पनेनुसार ' आत्मनिर्भर भारत - स्वयंपूर्ण गोवा ' ही मोहीम राबवली जात आहे या मोहिमेला गतिमत्ता येण्यासाठी या पंचमहाभूत लोकोत्सवाचा मोठाच फायदा होणार आहे त्यासाठी आपण गोवा प्रशासनाचे विविध प्रशासकीय प्रमुख तसेच स्वयंपूर्ण स्वयंसेवक यांना तातडीने या ठिकाणी उपस्थित राहून सर्वतोपरी माहिती घेण्याची  सूचना दिली असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली .                    नावामध्येच गाईचा उल्लेख केलेला गोमंतकीय गोवा राज्याशी सिद्धगिरी मठाचा हा पूर्वापार स्नेहबंद राहीलेला आहे .विद्यमान परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी  यांच्या माध्यमातून तो अधिकच दृढ झालेला आहे. आणि या लोकोत्सवातून तो अगदी गतिमानतेने वाढत जाईल. त्या आणि या संदर्भाने गोवा राज्याला कायम काड सिद्धेश्वर स्वामीजी आणि या परिसराचे मार्गदर्शन लावावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली .  

लाखोच्या संख्येत असलेले  विविध राज्यातील मठ मंदिरे आणि त्यांचे प्रमुख साधूगण यांच्या विचार मंथनातून या ठिकाणी होत असलेली पर्यावरण विषयक जनजागृती आणि त्यांचा अनुयायी - भक्तजन यांच्या  सहभागाने एक मोठी लोक चळवळ अध्यात्मिक पायावर या लोकोत्सवामधून सुरू होत आहे. आणि या सर्वांचे आपण एक सहभागी साक्षीदार आहोत. आणि या क्षणाचा आपण साक्षीदार असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचेही मत त्यांनी शेवटी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top