यश सचिन कळंत्रे ची चमकदार कामगिरी.

0

JEE MAINS Phase-1 परीक्षा उत्तीर्ण.

आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 'यश' सह आणखी 3 विद्यार्थी यशस्वी.

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 'यश कळंत्रे' ने JEE MAINS PHASE -1 परीक्षा उत्तीर्ण होऊन चमकदार कामगिरी बजावली. त्याच्यासह अकॅडमीचे आणखी 3 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांचे यश.आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांनी JEE MAINS PHASE -1 यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमीचा कॅडेट यश सचिन कळंत्रे, कॅडेट विवेक कोंडाजी पवार, कॅडेट सार्थक नितीन आसने व कॅडेट ऋषिकेश संतोष पवार यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांनी अचूक ध्येय, जिद्द, आणि चिकाटीच्या बळावर JEE  परीक्षेत यश मिळाले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.आत्मा मालिक संकुलाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमी चा कॅडेट यश सचिन कळंत्रे, कॅडेट विवेक कोंडाजी पवार, कॅडेट सार्थक नितीन आसने व कॅडेट ऋषिकेश संतोष पवार यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता बारावीत शिकत असून एनडीए चा अभ्यास देखील करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी JEE MAINS सारख्या परीक्षेत यश संपादन करून अकॅडमीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.


अकॅडमीत आनंदाचे वातावरण.


यापूर्वीही अकॅडमीच्या 5  विद्यार्थ्यांची 2020 व 2021 मध्ये भारतीय सैन्य दलात 'लेफ्टनंट' या पदावर निवड झालेली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी 41 वेळा एस. एस. बी. मुलाखत दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संकुलात व अकॅडमीत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संत परिवार, अध्यक्ष, सर्व विश्वस्त, प्राचार्य, अकॅडमीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top