भारताचा विश्व कल्याणाचा विचार असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊच- एस. व्ही. शर्मा. शास्त्रज्ञ, इस्त्रो.

0

- पंचमहाभूत लोकोत्सवाचा दुसरा दिवस. 

- प्रथमसत्र-‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्र. 

प्रतिनिधी: शैलेश माने.


कोल्हापूर,दि.२१ - जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषी,मुनी यांनी जे शोध लावले आहेत केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत. आपल्या प्रत्येकाला काळजी आहे की पर्यावरणाचे यापुढील काळात कसं होईल; मात्र भारत वैश्विक विचाराचा पाया असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ, असा विश्‍वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला. ते पंचमहाभूत लोकोत्सवात २१ फेब्रुवारीला ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्रात बोलत होते.


यावेळी राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल, ‘एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे,अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राजस्थान येथील प.पू.अभयदासजी महाराज, पेजावर येथील विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामिजी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते.


यावेळी राजस्थान येथील प.पू. अभयदासजी महाराज म्हणाले, ‘‘इथे सहभागी लोक भाग्यवान आहेत की अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. श्री. क्षेत्र सिद्धगिरीचे कार्य अद्भूत असून संत काय करू शकतात याची प्रचिती या निमित्ताने येते.’’राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल म्हणाले, ‘‘आज देशातील ६० टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशी स्थिती आहे. देशात सर्वत्र आज कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. देहलीसारख्या ठिकाणी तीन अतिभव्य कचर्‍याचे डोंगर आहेत. सरकार काही करेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता नागरिकांनाच पुढाकार घेऊन कृती करावी लागेल.’’‘एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले, ‘‘आदिवासी लोकांसाठी निसर्ग आणि समाज हे वेगळे नसून ते एकच समजतात. ते कधीही भूमीचे तुकडे पाडत नाहीत. पंचमहाभूतांचे संवर्धन केल्यानेच विश्‍वाचे कल्याण होणार आहे.’’

पेजावर येथील विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामिजी म्हणाले, ‘‘पंचमहाभूतांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण आकाशात अनेक उपग्रह पाठवले; मात्र त्यातील अनेकांचे काम झाल्याने ते आता कचरा म्हणून अवकाशात आहेत. तरी अशा गोष्टींवर आपण योग्य त्या उपाययोजना काढल्या पाहिजेत.’’

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारे, अग्निसारखे तेजस्वी, वायूसारखे प्रवाही, आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारे असे व्यापक व्हावे.’’ 


- बुधवारी उद्योग संमेलन आयोजन.


 पंचमहाभूत लोकोत्सवात बुधवारी उद्योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोल्हापुरातील सर्व उद्योग संस्था तसेच केंद्र राज्य सरकारचे उद्योग विषयक सचिव प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी याचा लाभ सकाळी 11 ते 2 यावे सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे .आज पासून सुरु झालेल्या देशी जनावरे आणि गाढव प्रदर्शनास ही मोठा प्रतिसाद लाभत आहे . . .

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top