*कर्नाटक राज्यात विधानसभेच्या सर्व जागांच्या निवडणुकीसाठी 10 मे 2023 रोजी मतदान होणार.---- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.*

0

*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*

( *अनिल जोशी* )कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या सर्व जागांच्या निवडणुकीसाठी, 10 मे 2023 रोजी मतदान होणार असून, मतमोजणीची तारीख 13 मे 2023 अशी निर्धारित करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत सांगितली आहे. गेले काही दिवस कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीविषयी निवडणूक केव्हा होणार ?अशी राजकीय चर्चा रंगली होती .दरम्यान 13 एप्रिल 2023 रोजी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, 20 एप्रिल 2023 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकची तारीख जाहीर झाल्यानंतर ,संपूर्ण कर्नाटक राज्यात आज पासून आचारसंहिता लागू झाली आहे. शिवाय कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी, कर्नाटक राज्यातील 80 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध मतदारांना आपल्या घरातूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. याबरोबरच कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी धनशक्तीचा प्रयोग होण्याची शक्यता तसेच शहरातील मतदारांची सध्यस्थितीत जाणवत  असणारी उदासीनता ही प्राथमिक चिंता वाटत असल्याचे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना यांनी म्हटले आहे. कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना हे आज बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलत होते .एकंदरीतच कर्नाटक राज्यातील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल , तसतशी राजकीय रंगत वाढत जाणार असून, विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे एकमेकांच्यावर आरोप -प्रत्यारोप होऊन, कर्नाटक विधानसभेची निवडणूक गाजणार आहे असे सध्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top