*सांगलीत अंकली ते बस स्टॅन्ड कोल्हापूर रोडच्या विविध मागण्यांसाठी, शनिवार दिनांक 11/03/2023 रोजी, सर्वपक्षीय कृती समिती कडून रस्ता रोको आंदोलन----*

0

 *सांगलीत अंकली ते बस स्टॅन्ड कोल्हापूर रोडच्या विविध मागण्यांसाठी, शनिवार दिनांक 11/03/2023 रोजी, सर्वपक्षीय कृती समिती कडून रस्ता रोको आंदोलन----* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )



 कोल्हापूर रोड सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने, आज कोल्हापूर रोड वरील गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार होणाऱ्या अपघाताची एक मालिका सुरू आहे.त्या अपघातानं  बऱ्याच नागरिकांचा जीव गमवावा लागेला आहे तसेच काही लोक कायमस्वरूपी जायबंदी झालेले आहेत .या रस्त्यावर अंकली पासून ते बसस्थानक पर्यंत कोणत्याही ठिकाणी पथदिवे नाहीत,रस्त्यावर कोठेही दिशा दर्शक फलक नाहीत,तांत्रिक दृष्ट्या योग्य गतिरोधक नाहीत, यावर लवकरात लवकर तातडीच्या उपाय योजना करण्यात याव्यात तसेच हा रस्ता भुमी संपादन झालेला असून, याचा मोबदला ही जमीन मालकांना मिळालेला आहे.पुढील काळात हा रस्ता पूर्ण क्षमतेने होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे 1) रस्त्यावर पट्टे मारणे 2) डिवायडर बसवणे 3)रोड वर पथदिवे बसवणे 3)सिग्नल बसवणे 4)तांत्रिक दृष्ट्या योग्य गतिरोधक बसवणे 5)रस्ता रुंदीकरण करून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करणे याबाबत चर्चा झाली, तसेच यासाठी शनिवार दिनांक 11/03/2023 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या मीटिंग साठी भागातील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,भागातील राजकीय नेते उपस्थित होते.



गौतम पवार,सतीश साखळकर,हणमंतराव पवार,राजू नलवडे,लहू भडेकर,शरद नलवडे,धनजय वाघ,प्रशांत भोसले,अमर शेटे,विनायक काळेल,संदीप दळवी,विलास शिंदे,सुरज चोपडे,दिलीप महिंद, असलम बागवान,मन्सूर bhi नाईक,हेमंत बाबर,गणेश फडके,गणेश पवार,संजय आडूळकर,देवा कांबळे,शैलेश पवार,अशोक सत्याळ,शशिकांत ओमासे,सचिन पाटील,रोहित जगदाळे,सलीम पन्हाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top