मिरजेतील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आज शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न व रविवार दि.12 मार्च 2023 रोजी सांगलीत विराट "मोर्चा"

0

मिरजेतील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आज शासकीय निमशासकीय  कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी व्यापक बैठक संपन्न व रविवार दि.12 मार्च 2023 रोजी सांगलीत विराट "मोर्चा"


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी)

आज मंगळवार दि.७ मार्च २०२३ रोजी मिरजेत गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात सांगली जिल्ह्य़ातील शासकीय, निमशासकीय व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध सव्वाशे संघटनांच्या सुमारे ३०० पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक सांगली जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील बाबा यांनी आयोजित केली होती.या बैठकीत बाबा म्हणाले, 'मी काही काळ शिक्षक म्हणून काम केले आहे. 

सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कायमच मला उत्कृष्ट सहकार्य लाभले आहे. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल उभे करताना मला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भक्कम साथ मिळाली त्यामुळे या सर्व घटकांच्या व्यथा वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. १७ वर्षापूर्वी या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू झाली आणि शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. उभी हयात नोकरी करुन त्यांना जर अडीच तीन हजार पेन्शन मिळत असेल तर ती त्यांची चेष्टाच आहे.

 जुन्या पेन्शन योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर चांगला आधार मिळत होता. हा आधारच काढून घेतल्याने त्यांचे संसार अडचणीत आले. हे पहात बसणे मला पटले नाही. म्हणून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी काय करता येईल या विचाराने माझ्या मनात थैमान घातले आणि मग ठरवलं या साऱ्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणून जुन्या पेन्शन योजनेच्या लढ्याची आगामी दिशा ठरवायची. त्यासाठी पक्ष, व्यक्ती याही पलिकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन विविध संघटना पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक आयोजित करायची. '



झालं. त्यानुसार सांगलीत आज दि. ७ मार्चला गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये बैठक घेतली. या बैठकीस न भूतो न भविष्यती प्रतिसाद मिळाला. सुमारे सव्वाशे संघटनांचे तीनशे पदाधिकारी व प्रतिनिधींनी हजेरी लावली. अनेक पदाधिकाऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्याची सूचना करुन बाबांना मोर्चाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. बाबांनी तातडीने ही विनंती मान्य केली. तुमचाच एक सहकारी म्हणून आपल्या सहकार्याने पुढाकार घेऊन या रविवार दि.१२ मार्च २०२३ रोजी सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौकातून स. १०.००वा विराट मोर्चा काढण्यात येईल व त्याचा समारोप जुन्या कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन देऊन मान्यवरांची भाषणे होऊन मोर्चाचा समारोप होईल. मोर्चाचा आवाज विधीमंडळाच्या अधिवेशनात घुमेल असा मोर्चा होईल. सर्व घटकांनी कुटुंबियांसह मोर्चात सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहनही केले.

विविध संघटना पदाधिकारी व प्रतिनिधींनी या मोर्चात सहकुटुंब सहभागी होऊ असे सांगताना प्रचंड टाळ्यांचा गजर होत होता. 

एकच मिशन.. जुनी पेन्शन या घोषणेनी सभागृह दणाणून गेले. अशा प्रकारे जुन्या पेन्शन योजनेचे रणशिंग फुंकले गेले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि सांगली जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील अण्णा व प्रा. आर. एस चोपडे यांनी या लढ्याला संपूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले त्यामुळे सर्वांनाच हत्तीचे बळ आले. सबंध राज्यातील जुनी पेन्शन पिडीताना दिलासा देणारा हा निर्णय ऐतिहासिक आहे.सांगली काय करु शकते हे दाखवून देणारा हा मोर्चा राज्याला दिशा देणारा नक्कीच ठरेल हे मात्र खरं. येणाऱ्या अनेक पिढ्यांना यामुळे दिलासा मिळेल यात शंका नाही. कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी नवी पेन्शन योजना रद्द होऊन जुनीच पेन्शन योजना लागू होण्यासाठी बाबांची ही तळमळ आणि त्यांची मानवतावादी संवेदनशीलता अनेकांची मने जिंकून गेली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top