कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1899 सभासद साखर सहसंचालकांनी वैध ठरवल्याने महाडिक गटाला दिलासा

0

 कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1899 सभासद साखर सहसंचालकांनी वैध ठरवल्याने महाडिक गटाला दिलासा  


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )



 कोल्हापूर येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1899 सभासद, माननीय प्रादेशिक सहसंचालक साखर) कोल्हापूर विभाग यांनी निवडणुकीसाठी वैध ठरवल्याने, महाडिक गटाला मोठा दिलासा मिळाला असून ,आमदार सतेज पाटील गटाला हा निर्णय धक्कादायक मानला जातो. माननीय प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्याकडे, श्री छत्रपती राजाराम कारखान्याच्या मतदार यादीवर, दोन्ही गटानी हरकती घेतल्या होत्या. त्यावर दोन्ही बाजूंच्या गटांनी आपली मते मांडली होती .त्यानुसार ता. 01 मार्च 2023 रोजी सुनावणी पार पडून, सुनावणीचा निकाल आज देण्यात आला आहे .यामध्ये माननीय प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1899  सभासदांना निवडणुकीसाठी, वैध ठरवण्याचा निर्णय दिला आहे. सदरहू मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांच्या निर्णयाने महाडिक गटाला मोठा दिलासा मिळाला असून, आमदार सतेज पाटील यांच्या गटाला हा निकाल धक्कादायक म्हणावा लागेल. यापूर्वी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने 1899 सभासदांच्या वर आक्षेप नोंदवलेले होते. माननीय प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी हे सर्व अाक्षेप फेटाळून लावून ,या सर्व 1899 सभासदांना निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरवले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top