*सांगलीतील मिरज येथे कै. उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समिती तर्फे, रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजता, संगीत सभेचे आयोजन.-----*

0

 *सांगलीतील मिरज येथे कै. उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समिती तर्फे, रविवार दि. 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6:00 वाजता, संगीत सभेचे आयोजन.-----* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* ) सांगलीतील मिरज येथे कै. उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समितीतर्फे, दि. 19 मार्च 2023 वार रविवार रोजी सायंकाळी 6:00 वाजता, स्थळ- मुक्तांगण खरे मंदिर ब्राह्मणपुरी मिरज येथे संगीत सभेचे आयोजन करण्यात आलेले असून ,24 वा कै. उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम स्थळी,  कार्यक्रमाचे उद्घाटन, सत्कार सोहळा, आणि संगीत सभा संपन्न होणार  आहे. रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी  6:00 वाजता, विदुषी मंगलाताई जोशी यांच्या शुभहस्ते, 24 व्या स्मृतिदिन महोत्सवाचे उद्घाटन, त्याचबरोबर गानसुधाकर पंडित महादेवाप्पा हुल्याळ व संगीत अकादमी पुरस्कार प्राप्त मजीद भाई सतार मेकर यांचा सत्कार समारंभ ,पं. मुकुल कुलकर्णी व पं. श्री रवींद्र यावगल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे त्यानंतर कै. उस्ताद गणपतराव कवठेकर यांच्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त, संगीत सभेचे आयोजन करण्यात आले असून ,प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक पं. मुकुल कुलकर्णी पुणे, यांचे शास्त्रीय गायन होणार आहे .त्यांना संवादिनी साथ श्री. सारंग सांभारे व तबलासाथ श्री. विनायक सबनीस हे करणार आहेत व त्यानंतर तबला वादक पंडित श्री रवींद्र यावगल बेंगलोर यांचे एकल तबला वादन होणार असून ,त्यांना लेहरासाथ श्री. योगेश रामदास ,बेळगावी हे करणार आहेत. कै. उस्ताद गणपतराव कवठेकर यांच्या शिष्य वर्गात विशेषतः  श्रीकांत चितळे ,बंडोपंत नाईक, कल्याण देशपांडे ,प्रदीप सरदेसाई आदींचा उल्लेख करावा लागेल. कै. उस्ताद गणपतराव कवठेकर स्मृती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. कल्याण देशपांडे, कार्यवाहक श्री विनायक गुरव व सर्व कार्यक्रम समिती सदस्य यांंनी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सर्व कार्यक्रम मुक्तांगण ,खरे मंदिर, ब्राह्मणपुरी, मिरज येथे होणार असून, ठरलेल्या वेळेप्रमाणे कार्यक्रम वेळेत सुरू होतील. त्याचप्रमाणे संगीत रसिक श्रोत्यांना व रसिकांना हा कार्यक्रम  विनामूल्य असणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top