सांगलीत आज कवलापूर विमानतळ रद्द करण्याच्या 2009 व 2015 च्या शासकीय ठराव परिपत्रकाची सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून होळी

0

 सांगलीत आज कवलापूर विमानतळ रद्द करण्याच्या 2009 व 2015 च्या शासकीय ठराव परिपत्रकाची सर्वपक्षीय नेत्यांच्याकडून होळी


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 ( अनिल जोशी )

 सांगलीत आज कवलापूर विमानतळ रद्द करण्याच्या 2009 व 2015 च्या शासकीय ठराव परिपत्रकाची, सर्वपक्षीय नेत्यांच्या कडून होळी करण्यात आली. कालच सांगलीत झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत कवलापूरला कोणत्याही परिस्थितीत विमानतळ खेचून आणू असा निर्धार व्यक्त करण्यात आला होता.

 पुढील शंभर वर्षे सांगलीच्या विकासाला चालना देणारा व दिशा ठरवणारा हा एक केंद्रबिंदू आहे. काल झालेल्या माधवनगर रोडवरील पाटीदार भवन मध्ये आयोजित केलेल्या, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार, आज 2009 व 2015 च्या कवलापूर विमानतळ रद्द करण्याच्या शासकीय ठराव परिपत्रकाची होळी करण्यात आली. आज शासकीय ठराव परिपत्रकाच्या होळी कार्यक्रमात समितीचे नेते सतीश साखरकर, निमंत्रक पृथ्वीराज पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक हनुमंत पवार ,माजी आमदार दिनकर पाटील ,माजी आमदार नितीन शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्माकर जगदाळे, आर.पी.आयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, व्यापारी एकता आंदोलनाचे समीर शहा, स्वाभिमानीचे नेते महेश खराडे ,संदीप राजोबा यांच्यासह विविधपक्षातील नेते मंडळी हजर होती .

सांगलीतील कवलापूरच्या विमानतळाची मागणी हा सामान्य विषय नसून ,100 वर्षाचे सांगलीचे विकासाचे भवितव्य घडवणारा लढा आहे .सांगलीतील विविधपक्षांच्या नेत्यांच्यामध्ये ,कवलापूर विमानतळाच्या बाबतीत फार मोठी एकजूट असल्याचे अधोरेखित झाले आहे. सांगलीतील कवलापूरला विमानतळ होणाच्या मागणीसाठी, सर्वपक्षीय नेत्यांचा व सांगलीकर जनतेचा संघर्षाचा रेटा हा यापुढील काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात उभारणार असल्याचे दिसून आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top