अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर ,इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 क्रिकेट सामन्यांची सुरुवात आज पासून होणार.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी )अहमदाबाद येथे आज पासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 च्या क्रिकेट सामन्यांची सुरुवात, नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून, पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, यंदाच्या सिझनचा आयपीएल 2023, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचा थरार आज पासून सुरुवात होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामना जवळपास पाच वर्षानंतर चालू होऊन रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यंदाच्या आयपीएल क्रिकेट सामन्यांची धुमधडाक्यात सुरुवात होणार आहे.अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदांना, तमन्ना भाटिया ,गायक अर्जित सिंह हे सर्व बॉलीवूड कलाकार उद्घाटन समारंभास रंगत आणणार आहेत. याशिवाय कतरीना कैफ ,टायगर श्रॉफ यांचा देखील परफॉर्मन्स उद्घाटन समारंभात बघायला मिळण्याचा आनंद लाभणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटन समारंभाला सुरुवात होऊन,  उद्घाटन समारंभ सुमारे 45 मिनिटे चालणार आहे. यंदाच्या सीजनचे इंडियन प्रीमियर लीग चे म्हणजेच आयपीएलच्या सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण, स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध होणार आहे. उद्घाटन समारंभाचे देखील थेट प्रक्षेपण, सर्व क्रिकेट रसिकाना लाईव्ह उपलब्ध होणार आहे. यंदाच्या वर्षीच्या सीजनचे इंडियन प्रीमियर लीग चे सर्वसामने हे रंगतदार होणार असून, क्रिकेट रसिकांना एक उत्कंठावर्धक सामन्यांची मालिका पहावयास मिळेल असे दिसते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top