*सांगलीत, दिनांक 23 मार्च व 24 मार्च 2023 रोजी ,पहिली "महिला महाराष्ट्र केसरी "भव्य कुस्ती स्पर्धा भरवण्याचे आयोजन----*

0

 *सांगलीत, दिनांक 23 मार्च व 24 मार्च 2023 रोजी ,पहिली "महिला महाराष्ट्र केसरी "भव्य कुस्ती स्पर्धा भरवण्याचे आयोजन----* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी* ) महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच सांगलीमध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुरुष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच, ही महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली असून, एकंदरीत महिला कुस्तीपटूंसाठी आनंदाची गोष्ट असून, सांगलीकर कुस्तीप्रेमी शौकिनांसाठी एक आनंदाची पर्वणी असणार आहे. पुण्यात आज महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची, राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, पुणे शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष अमोल बराटे यांच्या उपस्थितीत एक बैठक होऊन ,त्यानंतर पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दिनांक 23 आणि 24 मार्च 2023 रोजी ,सांगलीत या स्पर्धा भरवण्याचे नियोजन आहे. सदरहू पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, सांगली जिल्हा तालीम संघाने केले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी दिली. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा  वजनी गटात खेळवली जाणार असून, त्यामध्ये 50 53 55 57 59 62 68 72 व 76 असे वजनी गट असतील. तसेच ही स्पर्धा फक्त मॅटवर खेळवली जाणार आहे .पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर ,25 मार्च व 26 मार्च 2023 रोजी कोल्हापूर येथे कुमार गटाच्या राज्य अजिंक्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर कैलासवासी मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र इथे, वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा 27 मार्च व 28 मार्च 2023 रोजी होतील. या स्पर्धेचे आयोजन अमोल बराटे यांनी केले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी दिली .पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूस, महिला महाराष्ट्र केसरी किताब व चांदीची गदा देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान नामदेवराव मोहिते यांनी दिली .पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी पदाचा किताब कोण महिला पैलवान जिंकणार ? याच्या उत्सुकतेसह त्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी नावाची नोंद ,महिला कुस्तीगीर स्पर्धा इतिहासात होणार असून, ह्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं यंदाचा पहिलंच वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्व महिला कुस्तीगीर पटूंचे व कुस्ती शौकिनांचे लक्ष, पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण होणार ?याकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top