देशातील करदात्यांना, पॅनकार्ड आधारकार्ड ला जोडण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 ( अनिल जोशी )



 देशात करदात्यांना, पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी, आणखी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, लवकरच याबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे जारी करण्यात येत आहे. पॅन कार्ड ,आधार कार्ड ला लिंक नसल्यामुळे करदात्यांना अनेक परिणामांना सामोरे जावे लागणार होते, परंतु आता पॅन कार्ड, आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदीनुसार, 01 जुलै 2017 रोजी पॅन कार्ड वाटप करण्यात आलेल्या व आधार कार्ड प्राप्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीने, विहित प्राधिकरणाला त्याचे आधार कार्ड सुचित करणे आवश्यक आहे, किंवा 31 मार्च 2023 पूर्वी विहीत शुल्क भरून, ते लिंक करणे गरजेचे होते. आता पॅन कार्ड ,आधार कार्डशी लिंक करण्यासाठी, 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशातील जवळपास 51 कोटी अधिक पॅनकार्ड, आधारकार्डशी जोडले गेले आहेत .ज्यांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करायचे आहे अशा व्यक्तींनी ,खालील लिंक वर प्रवेश करून, पॅनकार्ड ,आधारकार्ड शी लिंक करावे.देशातील करदात्यांना, पॅनकार्ड आधारकार्ड ला जोडण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top