सांगलीत गुरुवार दि.30/ 3/ 2013 रोजी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मतिथीला म्हणजेच रामनवमीला दीपोत्सवाचे व महाआरतीचे आयोजन -----

0

  जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 ( अनिल जोशी )


     सांगलीत मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मतिथि दिवशी म्हणजेच रामनवमीचे औचित्य साधून, पवित्र कृष्णाकाठी 11111 दिव्यांच्या दिपोत्सवाचे व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या ईश्वरीय शक्तीची गौरव गाथा ऐकून, उत्तम चरित्र काय असते? याची भक्तांना नेहमीच प्रचिती येत असते अशा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या 51 फुटी प्रतिमेसमोर, सदरहू दीपोत्सवाचे व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सवाचा व महाआरतीचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून, गुरुवार दि. 30/ 3/ 2023 रोजी सायंकाळी 7:00 वाजता, माई घाट, स्वामी समर्थ मंदिर, कृष्णातीर सांगली येथे साजरा होणार आहे .हा कार्यक्रमाचे पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्यामार्फत आयोजन झाले असून, प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांची असणार आहे. सांगली नगरीतील सर्व रामभक्तानी, रामनवमीनिमित्त होणाऱ्या या दीपोत्सव महाआरतीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमास भाग घेऊन व उपस्थित राहून  आनंद द्विगुणित करावा असे आयोजकांनी कळवले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top