केंद्र सरकारने, देशात 7432 जलद इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 800 कोटी रुपयांची तरतूद केली.-- केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ .महेंद्रनाथ पांडे.

0

  जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 ( अनिल जोशी) 


    केंद्र सरकारने संपूर्ण देशात, 7432 जलद इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यासाठी जवळपास 800 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी दिली आहे. सध्या परिस्थितीत भारतातील सध्याच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या भरपूर प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीच्या उद्देशाने मार्च 2015 रोजी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहने उत्पादन आणि जलद अनुकूलन अर्थात फेम इंडिया हा उपक्रम चालू केला होता. दरम्यान हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यासारख्या प्रमुख कंपन्यांकडून, संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग साठी लागणारे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स उभारण्याकामी फार मोठ्या प्रमाणावर मदत घेऊन विस्तार केला जाणार आहे.

     मार्च 2024 पर्यंत 7 432 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्सची उभारणी पूर्ण करण्यात येणार असून, सध्याच्या परिस्थितीत जवळपास संपूर्ण देशात  6586 चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध आहेत अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी दिला. एकूणच भारत देशातील वाहतूक व्यवस्थेला गती, स्वच्छता तसेच विकसित होण्यासाठी याची मदत होईल. सध्या परिस्थितीत केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या पुरवठा सामग्रीवर जी 70 टक्के सवलत देण्यात येत आहे ,ती यापुढे ही पूर्ववत ठेवण्यात येईल अशीहि माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी दिली.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top