सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात, 8 मार्च 2023 वार बुधवारपासून सुरू होणार---*

0

 *सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळच्या सत्रात, 8 मार्च 2023 वार बुधवारपासून सुरू होणार---* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 ( *अनिल जोशी)* 



 सांगली जिल्ह्यातील, सध्याची उन्हाच्या तीव्रतेची परिस्थिती लक्षात घेऊन, सकाळच्या सूत्रात बुधवार दिनांक आठ मार्च 2023 पासून सुरू होणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी घेतला आहे .दरम्यान यापूर्वी शिक्षक भारती व शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषदेच्या शाळा उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन, सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी केल्यानुसार, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा दिनांक 8 मार्च 2023 वार बुधवारपासून, सकाळच्या सत्रात सुरू होतील. सध्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विषयक हित लक्षात घेऊन, हा निर्णय घेतल्याबद्दल विविध शिक्षक संघटनांच्या कडून याचे स्वागत करण्यात आलेले आहे. दरम्यान यापूर्वी शिक्षक संघ, शिक्षक भारती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भारतीय उर्दू संघटना यांचे कडून, सकाळच्या क्षेत्रात शाळा भरवण्याची मागणी करण्यात आली होती  त्यानुसार जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा ,नगरपालिका शाळा 8 मार्च 2023पासून, सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी सुरू होणार असून, मधली सुट्टी 9:00 ते 10:00 च्या दरम्यान असणार आहे व शेवटी शाळा 11:00 वाजता सुटणार आहे. याशिवाय शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार पहिली,दुसरी, सहावी च्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी गुणवत्ता शोध परीक्षा, ही रविवारी घेण्यात येणार नसून, रविवारचा दिवस वगळून, शाळेच्या वेळेतच परीक्षा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top